29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

फटोबा पडवणे संघाने मारली बाजी..! (नवलराज काळे क्रीडा इनिंग)

- Advertisement -
- Advertisement -

सुप्रसिद्ध देवगड तालुका मर्यादित पेंढरी बॉईज आयोजित “पेंढरी चषक २०२३ क्रिकेट ओव्हरर्म्स  .

सहसंपादक/नवलराज काळेदेवगड तालुक्यातील पेंढारी येथील रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती उत्सव” या आनंदी उत्सवाच्या मुहूर्तावर भरविण्यात आलेली देवगड तालुका मर्यादित पेंढरी बॉईज आयोजित “पेंढरी चषक २०२३ क्रिकेट ओव्हरआर्म्स स्पर्धा” अगदी थाटामाटात विरार चंदनसार येतील सुप्रसिद्ध अश्या तपस्या मैदानावर पार पडली. देवगड तालुक्यातील अगदी मोजक्या १६ बलाढ्य क्रिकेट संघांमध्ये या दिवशी चुरशीची रंगत पाहायला मिळाली. बसण्याची आसन व्यवस्था, साउंड व्यवस्था यांचे शिस्तबद्ध नियोजन आयोजन या वेळी पेंढरी बॉईज संघातील खेळाडूंनी केलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या वेळीची हि स्पर्धा थेट यु-ट्यूब लाईव्ह वर दाखविण्यात आली. बहुचर्चित, अल्पावधीत नावारूपाला आलेली हि क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी हजारो क्रिकेट प्रेमींनी उपस्थिती दाखविली.


हि स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडूने अहोरात्र मेहनत घेतली. सर्व मुलांना पाठबळ देण्यासाठी / मुलांचे मनोध्येर्य वाढविण्यासाठी / मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या वेळी प्रत्यक्ष गावावरून २० ते २५ प्रतिष्टीत गावकरी उपस्थित राहिले होते. पेंढरी ग्रामस्थ मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. अनंत गुरव, गावचे सरपंच श्री. मंगेश आरेकर  श्री. संजय घाडी, पेंढरी माध्यमिक शाळेचे मुख्यध्यापक श्री. लाडगावकर सर, श्री. दत्ताराम तिर्लोटकर, श्री. सत्यवान मनचेकर आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात झाली.
पेंढरी चषक २०२३ या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटविण्याचा सलग दुसऱ्या वर्षीचा मान फटोबा पडवणे या संघाला मिळाला. तर दुसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे मेन रोड गिर्ये व विग्नहर्ता वरंडवाडी या संघाना समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट बॉलर निनाद – मेन रोड गिर्ये आणि उत्कृष्ठ बॅट्समन हरीश जाधव पडवणे यांची निवड करण्यात आली. यावेळी सेमी फायनल संघांमधील खेळाडूंसाठी बेस्ट बॉलर, बेस्ट सिक्सर आणि बेस्ट बॅट्समन अशी तीन मेडल्स वितरित करण्यात आली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून विपुल श्राफ आणि धनंजय जाधव यांनी तर समालोचक म्हणून पेंढरी बॉईज संघातील अष्टपैलू खेळाडू श्री. प्रकाश झोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सुप्रसिद्ध देवगड तालुका मर्यादित पेंढरी बॉईज आयोजित "पेंढरी चषक २०२३ क्रिकेट ओव्हरर्म्स  .

सहसंपादक/नवलराज काळेदेवगड तालुक्यातील पेंढारी येथील रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती उत्सव" या आनंदी उत्सवाच्या मुहूर्तावर भरविण्यात आलेली देवगड तालुका मर्यादित पेंढरी बॉईज आयोजित "पेंढरी चषक २०२३ क्रिकेट ओव्हरआर्म्स स्पर्धा" अगदी थाटामाटात विरार चंदनसार येतील सुप्रसिद्ध अश्या तपस्या मैदानावर पार पडली. देवगड तालुक्यातील अगदी मोजक्या १६ बलाढ्य क्रिकेट संघांमध्ये या दिवशी चुरशीची रंगत पाहायला मिळाली. बसण्याची आसन व्यवस्था, साउंड व्यवस्था यांचे शिस्तबद्ध नियोजन आयोजन या वेळी पेंढरी बॉईज संघातील खेळाडूंनी केलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या वेळीची हि स्पर्धा थेट यु-ट्यूब लाईव्ह वर दाखविण्यात आली. बहुचर्चित, अल्पावधीत नावारूपाला आलेली हि क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी हजारो क्रिकेट प्रेमींनी उपस्थिती दाखविली.


हि स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडूने अहोरात्र मेहनत घेतली. सर्व मुलांना पाठबळ देण्यासाठी / मुलांचे मनोध्येर्य वाढविण्यासाठी / मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या वेळी प्रत्यक्ष गावावरून २० ते २५ प्रतिष्टीत गावकरी उपस्थित राहिले होते. पेंढरी ग्रामस्थ मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. अनंत गुरव, गावचे सरपंच श्री. मंगेश आरेकर  श्री. संजय घाडी, पेंढरी माध्यमिक शाळेचे मुख्यध्यापक श्री. लाडगावकर सर, श्री. दत्ताराम तिर्लोटकर, श्री. सत्यवान मनचेकर आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात झाली.
पेंढरी चषक २०२३ या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटविण्याचा सलग दुसऱ्या वर्षीचा मान फटोबा पडवणे या संघाला मिळाला. तर दुसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे मेन रोड गिर्ये व विग्नहर्ता वरंडवाडी या संघाना समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट बॉलर निनाद - मेन रोड गिर्ये आणि उत्कृष्ठ बॅट्समन हरीश जाधव पडवणे यांची निवड करण्यात आली. यावेळी सेमी फायनल संघांमधील खेळाडूंसाठी बेस्ट बॉलर, बेस्ट सिक्सर आणि बेस्ट बॅट्समन अशी तीन मेडल्स वितरित करण्यात आली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून विपुल श्राफ आणि धनंजय जाधव यांनी तर समालोचक म्हणून पेंढरी बॉईज संघातील अष्टपैलू खेळाडू श्री. प्रकाश झोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

error: Content is protected !!