भाजपा खासदार निशिकांत दुबे आणि प्रल्हाद जोशी यांनी दिली होती तक्रार.
ब्युरो न्यूज | दिल्ली : काॅन्ग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात लोकसभेतील भाजपा खासदार निशिकांत दुबे आणि प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राहुल गांधी यांना हक्कभंगाची नोटीस पाठविण्यात आली आहे.
अदाणी समूह प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत टीका केली होती. या प्रकरणी आता राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाने नोटीस बजावली आहे. लोकसभा सचिवालयाच्या विशेषाधिकार आणि वर्तणूक शाखेच्या उपसचिवांनिमी राहुल गांधींना ईमेलद्वारा ही नोटीस दिली आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना १५ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण तथा उत्तर अपेक्षीत असल्याचे नोटशीत नमूद केले आहे.
राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदींबद्दल चुकीचे, अवमानकारक, असंसदीय आणि दिशाभूल करणारे मुद्दे मांडल्याचा आरोप भाजपच्या खासदारांकडून करण्यात आला होता.