25.7 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

सुवर्णकारांनी व्यवसायातील नवनवीन आव्हानांवर विजय मिळवावा : अनिल चोडणकर

- Advertisement -
- Advertisement -

बांदा येथे संत नरहरी सोनार पुण्यतिथी उत्साहात साजरी.

बांदा |राकेश परब : आधुनीक युगात सुवर्णकार क्षेत्रात विविध नवनवीन व्यावसायिक आव्हाने येत आहेत. परप्रांतीय  कारागिरांगिरांचे या क्षेत्रात प्रमाण वाढत आहे. स्थानिक सुवर्णकारांनी आपली कला, कारागिरीचे कौशल्य, सातत्य यात वाढ करणे गरजेचे आहे. ‘गोमंत कालिका’ हे मासिक आपले हक्काचे व्यासपीठ आहे. सुवर्णकारांनी एकसंघ राहून व्यवसायातील आव्हानांवर विजय मिळवावा असे प्रतिपादन गोमंत कालिका मासिकाचे सहाय्यक संपादक अनिल चोडणकर यांनी  बांदा येथे केले.

बांदा दैवज्ञ   समाजाच्या वतीने संत श्री नरहरी सोनार पुण्यतिथी तसेच मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांचा पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. बांदा ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात आयोजित या सोहऴ्याच्या अध्यक्षस्थानावरुन चोडणकर बोलत होते  .
     
याप्रसंगी व्यासपीठावर गोमंत कालिकाचे सेक्रेटरी सुभाष लोटलीकर, खजिनदार संजीव नावेकर, सदस्य सर्वेश रायकर, बांदा दैवज्ञ समाज नुतन कार्यकारीणी अध्यक्ष सुरेश  चिंदरकर, उपाध्यक्ष  संतोष  चिंदरकर, खजीनदार राजाराम  धारगळकर, सेक्रेटरी  प्रसाद  चिंदरकर, महिला अध्यक्ष धनश्री  धारगळकर, उपाध्यक्ष पूजा चिंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले.यावेळी संत नरहरि सोनार आणि नाना शंकरशेठ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.

कार्यक्रमात सुरवातीला दिवंगत ज्ञातीबांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सोहळ्याच्या निमित्ताने बांदा ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, हॅण्डलूम साडी विक्री उद्योजिका पूजा तेंडले , संत नरहरी सोनार महाराज हाती छायाचित्र रेखटणारा यश चोडणकर,गुळदुवे ग्रामपंचायत सदस्य गणपत मोहन कारेकर, सिव्हिल इंजिनियर पदवीप्राप्त संजय चोडणकर तसेच अध्यक्ष अनिल चोडणकर, श्री. लोटलीकर,श्री. रायकर,श्री.नागवेकर यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णकार समाजातील अनेक गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या साहित्यावर पि.एच.डी म. केलेल्या डॉ. भक्ती महाजन आळवे यांचा गौरव करण्यात आला. भक्ती यांच्या वतीने वडिल गिरीश महाजन यांनी हा सत्कार स्विकारला. यावेळी गिरीश महाजन यांनी दैवज्ञ समाजाची युवा कीर्तनकार आर्या साळगांवकर हीेचे विशेष कौतुक करत पुष्पगुच्छ गौरव केला.
   
यावेळी संजय चोडणकर यांनी संत नरहरी सोनार यांचा जीवन चरित्रपट कथन केला.नुतन अध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी मनोगतात सांगितले की सर्व दैवज्ञ समाजबांधवांना एकत्र घेऊन ज्ञातीबांधवांच्या हितासाठी आपण नेहमीच प्रयत्न करणार आहोत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हनुमंत मालवणकर यांनी केले. सत्कारमूर्ती परिचय मंगलदास साळगांवकर यांनी तर आभारप्रदर्शन अक्षता साईराज साळगांवकर यांनी केले.या सोहळ्याला सुवर्णकार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा येथे संत नरहरी सोनार पुण्यतिथी उत्साहात साजरी.

बांदा |राकेश परब : आधुनीक युगात सुवर्णकार क्षेत्रात विविध नवनवीन व्यावसायिक आव्हाने येत आहेत. परप्रांतीय  कारागिरांगिरांचे या क्षेत्रात प्रमाण वाढत आहे. स्थानिक सुवर्णकारांनी आपली कला, कारागिरीचे कौशल्य, सातत्य यात वाढ करणे गरजेचे आहे. 'गोमंत कालिका' हे मासिक आपले हक्काचे व्यासपीठ आहे. सुवर्णकारांनी एकसंघ राहून व्यवसायातील आव्हानांवर विजय मिळवावा असे प्रतिपादन गोमंत कालिका मासिकाचे सहाय्यक संपादक अनिल चोडणकर यांनी  बांदा येथे केले.

बांदा दैवज्ञ   समाजाच्या वतीने संत श्री नरहरी सोनार पुण्यतिथी तसेच मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांचा पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. बांदा ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात आयोजित या सोहऴ्याच्या अध्यक्षस्थानावरुन चोडणकर बोलत होते  .
     
याप्रसंगी व्यासपीठावर गोमंत कालिकाचे सेक्रेटरी सुभाष लोटलीकर, खजिनदार संजीव नावेकर, सदस्य सर्वेश रायकर, बांदा दैवज्ञ समाज नुतन कार्यकारीणी अध्यक्ष सुरेश  चिंदरकर, उपाध्यक्ष  संतोष  चिंदरकर, खजीनदार राजाराम  धारगळकर, सेक्रेटरी  प्रसाद  चिंदरकर, महिला अध्यक्ष धनश्री  धारगळकर, उपाध्यक्ष पूजा चिंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले.यावेळी संत नरहरि सोनार आणि नाना शंकरशेठ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.

कार्यक्रमात सुरवातीला दिवंगत ज्ञातीबांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सोहळ्याच्या निमित्ताने बांदा ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, हॅण्डलूम साडी विक्री उद्योजिका पूजा तेंडले , संत नरहरी सोनार महाराज हाती छायाचित्र रेखटणारा यश चोडणकर,गुळदुवे ग्रामपंचायत सदस्य गणपत मोहन कारेकर, सिव्हिल इंजिनियर पदवीप्राप्त संजय चोडणकर तसेच अध्यक्ष अनिल चोडणकर, श्री. लोटलीकर,श्री. रायकर,श्री.नागवेकर यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णकार समाजातील अनेक गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या साहित्यावर पि.एच.डी म. केलेल्या डॉ. भक्ती महाजन आळवे यांचा गौरव करण्यात आला. भक्ती यांच्या वतीने वडिल गिरीश महाजन यांनी हा सत्कार स्विकारला. यावेळी गिरीश महाजन यांनी दैवज्ञ समाजाची युवा कीर्तनकार आर्या साळगांवकर हीेचे विशेष कौतुक करत पुष्पगुच्छ गौरव केला.
   
यावेळी संजय चोडणकर यांनी संत नरहरी सोनार यांचा जीवन चरित्रपट कथन केला.नुतन अध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी मनोगतात सांगितले की सर्व दैवज्ञ समाजबांधवांना एकत्र घेऊन ज्ञातीबांधवांच्या हितासाठी आपण नेहमीच प्रयत्न करणार आहोत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हनुमंत मालवणकर यांनी केले. सत्कारमूर्ती परिचय मंगलदास साळगांवकर यांनी तर आभारप्रदर्शन अक्षता साईराज साळगांवकर यांनी केले.या सोहळ्याला सुवर्णकार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!