भटवाडी गवळदेव, निरंकारी ब्राम्हण पोसेपाणी येथील श्री सत्यनारायण महापूजेचे औचित्य.
विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्री देव गवळदेव व निरंकारी ब्राम्हणदेव चिंदर भटवाडी पोसेपाणी येथे उद्या मंगळवारी ७ फेब्रुवारीला श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले गेले आहे. सकाळी ८ ते ९ वा. भगवती देवीला अभिषेक, ९ ते १० वा. निरंकारी ब्राम्हणदेव आणि श्री देव गवळदेव यांना अभिषेक, सकाळी १० ते दुपारी १ वा. सत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी १ ते ३ वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायं. ३ ते ५ वा. महिलांसाठी हळदीकुंकू, ५ ते ६ वा. फुगडी – श्री देवी भगवती महिला मंडळ चिंदर भटवाडी, ६ ते ७ आरती, भजन आणि दीपउत्सव – श्री देवी भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी, रात्रौ ८ वा. सुश्राव्य भजन- श्री आकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ (चिंदर गावठणवाडी), असे कार्यक्रमाचे स्वरुप आहे.
रात्रौ ९:३० वाजता, कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण. डबलबारी भजनाचा जंगी सामना, श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नाडण, बुवा संदीप पुजारे विरुध्द श्री निनादेवी प्रासादिक भजन मंडळ, उंडिल, बुवा व्यंकटेश नर यांच्यात होणार असून बुवा संदिप पुजारे यांना पख़वाज साथ मंजिल काळसेकर तर तबला साथ विनायक मेस्री करणार आहेत. तसेच व्यंकटेश नर यांना पख़वाज साथ सागर कदम तर तबला साथ भावेश लाड करणार आहेत. तरी भाविक भक्तांनी तिर्थप्रसाद महाप्रसादाचा व भजन रसिकांनी डबलबारी सामन्याचा आनंद घ्यावा असे आवाहन भगवती उत्साही मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.