१०५ नेत्र रुग्णांची मोफत झाली मोफत चिकित्सा.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या पडेल गांवात ‘ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन’ आणि आय हॉस्पिटल नेत्रालय, कणकवली व पडेल रिक्षा चालक मालक संघटना, पडेल व्यापारी संघटना, हिंदुस्थान मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने पडेल कॅन्टीन येथे सत्यनारायण पूजेचे औचित्य साधून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन पडेल कॅन्टीन येथेच केले गेले होते. या शिबिराचा लाभ १०५ नेत्र रुग्णांनी घेतला. या शिबिराचे आयोजन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनने केले होते.
नेत्र शिबिराचे उद्घाटन पडेल नवनिर्वाचित सरपंच भूषण पोकळे यांनी केले. यावेळेस उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, ग्रामपंचायत सदस्य, रिक्षा संघटना अध्यक्ष रामकृष्ण पाटणकर, व्यापारी संघटना अध्यक्ष जयेश तानवडे, त्याचप्रमाणे ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष मनोज तोरसकर, जिल्हा संघटक मंदार काणे, तालुका सचिव महेंद्र देवगडकर, तालुका महिला संघटक सौ.आदिती तानवडे, सदस्य शेखर दोड्डामणी, आसिफ मुल्ला, डॉ.जावेद खान, लायन्स आय हॉस्पिटलचे डॉ.अशोक कदम, स्पेक्टो मार्टचे मंगेश चव्हाण व रिक्षा चालक- मालक, व्यापारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.