५ फेब्रुवारीला कणकवलीत साजरी होणार संत रविदास जयंती.
कणकवली | प्रतिनिधी : चर्मकार बांधवांचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव यांनी केलेल्या आवाहनाला उत्तम प्रकारे प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज बांधव यांच्या वतीने संत रविदास महाराज जयंती उत्सव रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ कणकवली येथे साजरी करण्याचे आयोजित करण्यात आले आहे. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या सभेला जिल्ह्यातील सर्व चर्मकार संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. ही सभा कणकवलीत अध्यक्ष सुजित जाधव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती.
सभेत जिह्यातील समाज बांधव आपला समाज एकसंघ व्हावा या उद्देशाने एकत्र आले होते. त्यानुसार या सर्वांच्या उपस्थितीत महत्वाच्या विषयांवर चर्चा करून संत रविदास महाराज जयंती उत्सवाचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये उपस्थित सर्वांचे सहकार्य मोलाचे होते. त्यामध्ये रविंद्र पावसकर, पंढरी जाधव, देवेंद्र कसालकर, अंकुश किंजवडेकर, सुभाष जाधव, बाबल नांदोस्कर, प्रसाद मसुरकर, मयूर चव्हाण, आनंद जाधव, अनिल चव्हाण, प्रथमेश जाधव, दीपक जाधव, अमित जाधव, सुदर्शन तेंडोलकर, सौ.मानसी चव्हाण, रघुनाथ चव्हाण, प्राजक्त चव्हाण, सुंदर जाधव, मंजीत जाधव, मंगेश आरेकर, प्रसाद पाताडे आदी उपस्थित होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने संत रविदास महाराज जयंती उत्सव कृती समिती स्थापन करण्यात आली यामध्ये समिती प्रमुख विजय चव्हाण, सुजित जाधव, सौ.मानसी चव्हाण, महानंद चव्हाण, चंद्रसेन पाताडे, छोटू कदम, विठ्ठल चव्हाण, सी. आर. चव्हाण, तुळशीदास पवार, भरत पेंडुरकर, अंकुश चव्हाण, प्रकाश वाघेरकर, राजेंद्र चव्हाण, अनिल जाधव, महेंद्र चव्हाण आदींची कृती समितीवर सूचक पद्धतीने निवड करण्यात आली आहे. वरील सर्व समिती पदाधिकारी व सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे. तसेच या कार्यक्रमाचे ठिकाण लवकरच सर्वांना कळविण्यात येईल, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज व सुजित जाधव यांनी केले.