कट्टा येथे बॅरिस्टर नाथ पै यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी झाली साजरी.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कट्टा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे बॅरिस्टल नाथ पै यांची ५२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात सुरवातीला दीपक भोगटे यांनी बॅ नाथ पैं च्या जीवन चरित्राचा आढावा घेतला आणि नाथ पैं च्या विचारा चा मागोवा घेत सेवांगण राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
साळेल प्रभागाचे केंद्रप्रमुख सावंत सर यानी सेवांगणच्या विविध शैक्षाणिक उपक्रमामुळे कट्टा परिसरात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली असल्याचे नमूद करून सेवांगणच्या उपक्रमांची प्रशंसा केली.
मालवणचे गटशिक्षणाधिकारी श्री माने यानी बॅ नाथ पै हे लोकोत्तर संसदपटू असून त्यांच्या विचाराने चालणारी सेवांगण ही संस्था मालवणचे भूषण आहे.
सतत ४५ वर्षे स्पर्धा भरवणे ही फारच कौतुकास्पद बाब आहे. याचा उल्लेख करून गुणवंत मुलांचे कौतुक केले. या वेळी मोगरणे शाळेतल वेदा मराठे या ३ री मधल मुलीने ‘ती फुलराणी’ या नाटकातील स्वगत सादर केले. यावेळी सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या बाल स्पधी महोत्सवातील २०० गुणवंताना प्रशस्ती पत्र व शैक्षणिक वस्तू देऊन गौरविण्यात आले. वैष्णवी लाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले व बाळकृष्ण नांदोसकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, गटशिक्षणाधिकारी माने, केंद्रप्रमुख सावंत, वैष्णवी लाड,
बाळ नांदोसकर, चित्रकार हरेश चव्हाण, गीता नाईक, प्रियांका भोगटे, नाईक मॅडम, गावडे सर आणि परिसरातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते.