मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गडघेरावाडी चे सुपुत्र मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते, कोरोना योद्धा, अनेक रुग्णांना मदत करणारे विठ्ठल परब यांना मुंबई मुलुंड येथे मुंबई येथील प्रसिद्ध प्लॅटिनम हॉस्पिटल तर्फे त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन मुलुंड येथे मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी डॉक्टर विजय कुट्टी, डॉक्टर सचिन यादव, डॉक्टर विनय बोरवल, डॉक्टर नयना मॅडम आणि प्लॅटिनम मधील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
विठ्ठल परब यांनी मुंबई प्लॅटिनम हॉस्पिटल येथे अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले होते. अनेक रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना वेळोवेळी सहकार्य केले होते कोरोना काळातही कोरोना योद्धा म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा बजावली होती या कामाची दखल मुंबई मुलुंड येथील प्रसिद्ध अशा प्लॅटिनम हॉस्पिटल ने घेऊन यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी बोलताना विठ्ठल परब म्हणाले मी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन आज प्लॅटिनम हॉस्पिटल ने जो माझा गौरव केला आहे ते माझ्यासाठी मोठे भाग्याचे आहे.असे काम यापुढेही सुरू ठेवीन. प्लॅटिनम हॉस्पिटल मधील सर्व वरिष्ठ अधिकारी वर्ग, सर्व डॉक्टर, सर्व कर्मचारी आणि माझे सर्व मित्र या सर्वांच्या सहकार्यातून यापुढेही माझी सेवा अशीच कार्यरत ठेवेन. विठ्ठल परब हे मालवण तालुक्यातील मसुरे गावचे सुपुत्र असून मसुरे गावासहित संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामाजिक, आरोग्य, कला, क्रीडा, क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. विठ्ठल परब यांची मसुरे गावासहीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व मुंबईत प्रशंसा होत आहे.