बुवा समीर महाजन विरुद्ध बुवा मंगेश पाटणकर असा रंगणार जंगी सामना….!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील सौदाळे येथील नवलादेवी पटांगणावर ९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता आमने सामने डबल बारी भजन सामना आयोजित करण्यात आला आहे. मुणगे येथील भगवती प्रासादिक भजन मंडळ, बुवा समीर महाजन विरुद्ध ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ नाधवडे, बुवा मंगेश पाटणकर या दोहोंच्यात हा सामना होणार आहे. महाजन याना पख़वाज साथ राजू सावंत, तबला सुनील बोरकर तर पाटणकर याना पख़वाज साथ पवन तिलीटकर, तबलासाथ अमोल पांचाळ करणार आहेत.