मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे मार्गाचीतड येथील श्री महागणपती मंदिर येथे २५ जानेवारी रोजी श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्या वतीने “माघी श्री गणेश जयंती” उत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त सकाळी ०८.०० ते ०८.३० वा. श्री महागणपती पूजा व अभिषेक, स. ८.३० ते ०९.०० वा. सहस्त्रावर्तने,
स. ९.०० ते १२.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी १२.००ते १२.३० वा. महाआरती व तिर्थप्रसाद, दुपारी १२.३० ते ०२.०० वा. महाप्रसाद,
दुपारी २.०० ते ६.०० वा.
हळदीकुंकू समारंभ, सायं. ७.०० वा. देवश्री संगीत क्लासेस शाखा मसुरे बुवा श्री. सागर राठवड यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ ९.०० वा.
अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ, म्हापण, वेंगुर्ले यांचा पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग ‘मयुर जन्म’ आदी कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.