वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यातील कुसूर गावचे पोलिस पाटील रविंद्र सुर्याजी साळुंखे यांचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीम. वैशाली राजमाने यांनी महाराष्ट्र ग्रामीण पोलीस अधिनियम १९६७ अन्वये, अधिनियमाच्या खंड ९ (ड) नुसार शासकीय कामकाजात टाळाटाळ करणे आणि कामकाजात सहकार्य नसणे इ. बाबी निदर्शनास आल्याने त्यांचे एक वर्षासाठी निलंबन केले आहे.
कुसूरचे रहिवासी श्री संदीप शंकर सुर्वे (सुतारवाडी) यांनी कुसूरचे पोलिस पाटील श्री रविंद्र सुर्याजी साळुंखे यांच्या विरोधात गावातील काही भ्रष्ट पुढाऱ्यांशी हातमिळवणी करून, गावात जातीयवादी राजकारण करणे, गावातील लोकांमध्ये शंकास्पद वातावरण निर्माण करणे, गावातील लोकशाही, स्वातंत्र्य, समता या मुल्यांची पायमल्ली होईल असे वक्तव्य करणे अशा चुकीच्या आणि असंविधानीक कारभाराबाबत ३०/०९/२०२१ रोजी दिलेल्या तक्रार अर्ज आणि माहिती अधिकार अंतर्गत, कार्यकारी दंडाधिकारी, वैभववाडी आणि पोलिस निरीक्षक, वैभववाडी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, कुसूरचे पोलिस पाटील श्री रविंद्र सुर्याजी साळुंखे यांच्या कामकाजात गांभीर्यता आढळून आली नसल्याने, पोलिस पाटील श्री रविंद्र सुर्याजी साळुंखे यांना आदेशाच्या दिनांकापासून एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.