27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

कुडाळ मालवण तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच भाजपचा तर उपसरपंच शिवसेनेचा.

- Advertisement -
- Advertisement -

कुडाळ | ब्यूरो न्यूज :
कुडाळ मालवण तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत. सरपंच पदाची थेट जनतेतून निवडणूक झाल्याने अवघ्या काही मतांच्या फरकाने भाजपचे सरपंच निवडून आलेल्या ८ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या ८ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे उपसरपंच बसणार आहेत.

त्यामध्ये कुडाळ तालुक्यातील शिवापूर ग्रा.प.मध्ये ७ पैकी ५ सदस्य शिवसेनेचे आले आहेत. महादेवाचे केरवडे येथे ७ पैकी ४, हळदीचे नेरूर येथे ९ पैकी ६, कवटी येथे ७ पैकी ५ , हुमरस येथे ७ पैकी ४, तर मालवण तालुक्यातील किर्लोस येथे ७ पैकी ६, माळगाव येथे ७ पैकी ६ सदस्य शिवसेनेचे आले आहेत. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेचे उपसरपंच बसणार आहेत.तसेच बांधिवडे खुर्द कोईळ येथेही बिनविरोध उपसरपंच बसणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कुडाळ | ब्यूरो न्यूज :
कुडाळ मालवण तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत. सरपंच पदाची थेट जनतेतून निवडणूक झाल्याने अवघ्या काही मतांच्या फरकाने भाजपचे सरपंच निवडून आलेल्या ८ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या ८ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे उपसरपंच बसणार आहेत.

त्यामध्ये कुडाळ तालुक्यातील शिवापूर ग्रा.प.मध्ये ७ पैकी ५ सदस्य शिवसेनेचे आले आहेत. महादेवाचे केरवडे येथे ७ पैकी ४, हळदीचे नेरूर येथे ९ पैकी ६, कवटी येथे ७ पैकी ५ , हुमरस येथे ७ पैकी ४, तर मालवण तालुक्यातील किर्लोस येथे ७ पैकी ६, माळगाव येथे ७ पैकी ६ सदस्य शिवसेनेचे आले आहेत. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेचे उपसरपंच बसणार आहेत.तसेच बांधिवडे खुर्द कोईळ येथेही बिनविरोध उपसरपंच बसणार आहे.

error: Content is protected !!