अपराज कोंडवाडी ग्रामस्थ मंडळाचे आयोजन.
बुवा अभिषेक शिरसाट आणि बुवा व्यंकटेश नर यांच्यात रंगणार जंगी सामना.
विवेक परब | सहसंपादक : प्रतिवर्षी प्रमाणे अपराज-कोंडवाडी ग्रामस्थ मंडळाची श्री सत्यनारायण महापूजा मंगळवार २० डिसेंबरला श्री वाडात्री ब्राम्हण देव मंदिर येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता महाप्रसाद व रात्री ९ वाजता डबलबारी भजनाचा सामना बुवा अभिषेक शिरसाट, पखवाज साथ-रुपेश परब व तबला साथ-अभिषेक सुतार करणार आहेत. तसेच बुवा व्यंकटेश नर पखवाज साथ-सागर कदम व तबला साथ- भावेश लाड करणार आहे.
तरी सर्व भक्त गणांनी तिर्थप्रसादाचा व भजन रसिकांनी डबलबारी सामन्याचा आनंद घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.