तीन जणांवर वर झाले गुन्हे दाखल…
मसुरे | प्रतिनिधी : आंबा इमारती लाकडाची विनापरवाना मौजे घुमडे ता. मालवण येथुन सावंतवाडीकडे वाहतूक होत असलेबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजे बिबवणे ता. कुडाळ येथे तपासणी करून वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी दिली आहे. या कारवाईत मालवण तालुक्यातील तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी पहाटे ५.०० वाजताच्या सुमारास टाटा मॉडेल ११०९ वाहन क्र. एमएच०७ – सी ५९०७ या वाहनामधून लाकूड वाहतूक होत असल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली होती. सदर वाहनाची बिबवणे येथे तपासणी केली असता अवैध आंबा इमारती नग ३२/९.२२७ घनमीटर माल आढळून आला.
सदर प्रकरणी रुपेश जयवंत सावंत रा. बिळवस, सुधीर रमाकांत बिरमोळे रा. घुमडे व मोहन भगवान गावडे रा. ता. मालवण यांचेवर वनोपज लाकूड मालाची विनापरवाना विनापासी अवैध वाहतूक करून भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (2ब), महाराष्ट्र वन नियमवाली २०१४ चे नियम ३१, ८२ चे उल्लंघन केलेने गुन्हा नोंद करणेत आला आहे. वाहतूकीसाठी वापरण्यात आलेले टाटा मॉडेल ११०९ वाहन व इमारती लाकूड माल जप्त करण्यात आले असून पुढील तपास चालू आहे.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, लाकूड मालाची विनापासी अवैध वाहतूक करणे भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये प्रतिबंधित असून अशा अवैध वाहतुकीकरिता २ वर्षे पर्यंतच्या कारावासाची तसेच द्रव्यदंडाचीही तरदूत करणेत आलेली आहे.
सदर कारवाई उपवनसंरक्षक (प्रा.) सावंतवाडी श्री. शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी श्री. आय. डी. जालगावकर यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, कुडाळ श्री. अमृत शिंदे यांनी मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट , वनपाल धुळू कोळेकर ,वनरक्षक कांदळगाव श्री विष्णू नरळे, वनरक्षक नेरूर त हवेली श्री सावळा कांबळे, वनरक्षक माणगाव श्री बाळराजे जगताप यांसमवेत यशस्वी केली.