25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते नांदगाव समर्थ विकास पॅनेलच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या नांदगांव ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू झाली असून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत समर्थ विकास पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणेंच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, सरपंच पदाचे उमेदवार भाई मोरजकर, नांदगाव पंचायत समिती सदस्या सौ हर्षदा वाळके, सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, तोंडवली सरपंच मनाली गुरव, माजी सरपंच संजय पाटील, आनंद मोरजकर, नितेश म्हसकर, कमलेश पाटील, राजू तांबे, राजू खोत, आनंद गगनग्रास, यासिर मास्के, असलदे सरपंच उमेदवार रघुनाथ लोके, दयानंद हडकर, संतोष मिराशी, संतोष घाडी, प्रकाश परब, इरफ़ान साटविलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार नितेश राणेंनी कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करुन गावच्या एकंदर विकासासाठी या पॅनेलच्या सरपंचांसहीत इतर सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश मोरजकर, स्वागत पंढरी वायंगणकर यांनी केले आणि आभार भाई मोरजकर यांनी मानले आहे

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या नांदगांव ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू झाली असून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत समर्थ विकास पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणेंच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी भाजपाचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, सरपंच पदाचे उमेदवार भाई मोरजकर, नांदगाव पंचायत समिती सदस्या सौ हर्षदा वाळके, सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, तोंडवली सरपंच मनाली गुरव, माजी सरपंच संजय पाटील, आनंद मोरजकर, नितेश म्हसकर, कमलेश पाटील, राजू तांबे, राजू खोत, आनंद गगनग्रास, यासिर मास्के, असलदे सरपंच उमेदवार रघुनाथ लोके, दयानंद हडकर, संतोष मिराशी, संतोष घाडी, प्रकाश परब, इरफ़ान साटविलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार नितेश राणेंनी कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करुन गावच्या एकंदर विकासासाठी या पॅनेलच्या सरपंचांसहीत इतर सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश मोरजकर, स्वागत पंढरी वायंगणकर यांनी केले आणि आभार भाई मोरजकर यांनी मानले आहे

error: Content is protected !!