28.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

च़ल जहां ग़मके मारे ना हो, झूठ़ी आशा के तारे ना हो…!

- Advertisement -
- Advertisement -

( दिलीप कुमार जन्मदिन विशेष..!)

सिनेपट | जन्म दिनविशेष : भारतीय सिनेमा सृष्टीमध्ये मोहम्मद युसूफ ख़ान अर्थात् अभिनेते दिलीपकुमार यांचे आदरस्थान अग्रस्थानी आहे.
ते हिंदी सिनेमासृष्टीत, दीर्घकाळ आणि अखंड असे रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले पहिले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.
बाॅलीवुडचे पहिले अस्सल सुपरस्टार ‘ख़ान’ अशीही दिलीपकुमार यांची छबी आहे.
दिलीप कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता आणि सोबतच सर्वोत्तम अभिनेत्याचे सर्वाधिक आठ फिल्मफेअर पुरस्कारही दिलीपकुमार यांच्या कारकिर्दीत तथा प्रोफाईलमध्ये असल्याने त्यांच्या अभिनय क्षमतेचे सातत्य लक्षात येते.

१९४४ सालच्या ‘ज्वारभाटा’ या चित्रपटाद्वारे दिलीपकुमारांनी बॉलिवूडमध्ये सुरुवात केली. नंतर जवळपास पाच दशके म्हणजे त्यांच्या अभिनयाच्या जोरावर सिनेमा प्रेमींना मनोरंजनाची मेजवानी मिळाली.
अंदाज़, आन, दाग़, देवदास, आझाद, मुगल-ए-आझम, गंगा जमुना, राम और श्याम अशा असंख्य चित्रपटांचा त्यात समावेश आहे.
मध्यंतरी पाच वर्षे अभिनयापासून दूर राहून त्यांनी ‘क्रांती’ सिनेमाद्वारे पुनरागमन केले. १९८० च्या दशकातील सुरवातीचा सिनेमा ‘शक्ती’ म्हणजे सिनेमा रसिकांना, दिलीप कुमार आणि महानायक बिग बी अमिताभ बच्चनजी यांच्या अभिनयाचा जणू ‘कसोटी सामना’ वाटला.
नंतर मशाल, कर्मा, सौदागर अशा रसिकांची आजही पसंती असलेल्या सिनेमांमधून दिलीपकुमार यांची जादू कायम आहे हे सिद्ध झाले.
१९९८ साली आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला ज्यात रेखाजींनीही महत्वाची भूमिका वठवली होती. दिलीपकुमार हे ‘बॉलिवूडच्या सुवर्ण युगातील’ शेवटचे रत्न होते असे म्हणले जाते.

आज मोहम्मद युसूफ ख़ान म्हणजे दिलीप कुमार यांचा जन्मदिन.
तल़त मेहमूद यांनी त्यांना आवाज दिलेले एक गीत आहे “ऐ मेरे दिल कही और चल…ग़मकी दुनिया से दिल भर गया’ …त्यातील एक कडवं दिलीपजींच्या व्यक्तिमत्वाला साजेसेच आहे.
“च़ल जहां ग़मके मारे ना हो..
झूठ़ी आशाके तारे ना हो…,” अगदी याच ओळींप्रमाणे आजन्म स्वतःचा सन्मान स्वतः राखत काम करुन वास्तवात नेहमी जगलेल्या या अभिनेत्याला जन्मदिना निमित्त ‘सिनेवंदना!’

सिनेपट | आपली सिंधुनगरी चॅनेल

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

( दिलीप कुमार जन्मदिन विशेष..!)

सिनेपट | जन्म दिनविशेष : भारतीय सिनेमा सृष्टीमध्ये मोहम्मद युसूफ ख़ान अर्थात् अभिनेते दिलीपकुमार यांचे आदरस्थान अग्रस्थानी आहे.
ते हिंदी सिनेमासृष्टीत, दीर्घकाळ आणि अखंड असे रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले पहिले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.
बाॅलीवुडचे पहिले अस्सल सुपरस्टार 'ख़ान' अशीही दिलीपकुमार यांची छबी आहे.
दिलीप कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता आणि सोबतच सर्वोत्तम अभिनेत्याचे सर्वाधिक आठ फिल्मफेअर पुरस्कारही दिलीपकुमार यांच्या कारकिर्दीत तथा प्रोफाईलमध्ये असल्याने त्यांच्या अभिनय क्षमतेचे सातत्य लक्षात येते.

१९४४ सालच्या 'ज्वारभाटा' या चित्रपटाद्वारे दिलीपकुमारांनी बॉलिवूडमध्ये सुरुवात केली. नंतर जवळपास पाच दशके म्हणजे त्यांच्या अभिनयाच्या जोरावर सिनेमा प्रेमींना मनोरंजनाची मेजवानी मिळाली.
अंदाज़, आन, दाग़, देवदास, आझाद, मुगल-ए-आझम, गंगा जमुना, राम और श्याम अशा असंख्य चित्रपटांचा त्यात समावेश आहे.
मध्यंतरी पाच वर्षे अभिनयापासून दूर राहून त्यांनी 'क्रांती' सिनेमाद्वारे पुनरागमन केले. १९८० च्या दशकातील सुरवातीचा सिनेमा 'शक्ती' म्हणजे सिनेमा रसिकांना, दिलीप कुमार आणि महानायक बिग बी अमिताभ बच्चनजी यांच्या अभिनयाचा जणू 'कसोटी सामना' वाटला.
नंतर मशाल, कर्मा, सौदागर अशा रसिकांची आजही पसंती असलेल्या सिनेमांमधून दिलीपकुमार यांची जादू कायम आहे हे सिद्ध झाले.
१९९८ साली आलेला 'किला' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला ज्यात रेखाजींनीही महत्वाची भूमिका वठवली होती. दिलीपकुमार हे ‘बॉलिवूडच्या सुवर्ण युगातील' शेवटचे रत्न होते असे म्हणले जाते.

आज मोहम्मद युसूफ ख़ान म्हणजे दिलीप कुमार यांचा जन्मदिन.
तल़त मेहमूद यांनी त्यांना आवाज दिलेले एक गीत आहे "ऐ मेरे दिल कही और चल…ग़मकी दुनिया से दिल भर गया' …त्यातील एक कडवं दिलीपजींच्या व्यक्तिमत्वाला साजेसेच आहे.
"च़ल जहां ग़मके मारे ना हो..
झूठ़ी आशाके तारे ना हो…," अगदी याच ओळींप्रमाणे आजन्म स्वतःचा सन्मान स्वतः राखत काम करुन वास्तवात नेहमी जगलेल्या या अभिनेत्याला जन्मदिना निमित्त 'सिनेवंदना!'

सिनेपट | आपली सिंधुनगरी चॅनेल

error: Content is protected !!