26.8 C
Mālvan
Sunday, September 22, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

डामरे गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वाढले प्राबल्य..!

- Advertisement -
- Advertisement -

सरपंचपदाचे उमेदवार दिनेश मेजारी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसोबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात दाखल..!

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात होण्याआधीच नाट्यमय घटना घडत आहेत.
सर्वात उदयोन्मुख पक्ष म्हणून नावारुपाला येणार्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्राबल्यही आता निवडणुकीच्या तोंडावर ठळकपणे दिसू लागले आहे.
ग्रा पं निवडणूक प्रचाराला सुरुवात होत असतानाच कणकवली तालुक्यातील डामरे ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंचपदाचे अपक्ष उमेदवार दिनेश सुरेश मेजारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनेश मेजारी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी कणकवली विधानसभा संघटक संदेश पटेल, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, कणकवली तालुका समन्वयक सुनील पारकर आदी उपस्थित होते.
दिनेश सुरेश मेजारी यांच्यासह सुरेश दत्तात्रय मेजारी, विजय राजाराम मेजारी, दशरथ विठोबा मेजारी, सुमित राजाराम मेजारी, लक्ष्मीकांत सुरेश मेजारी, शंकर रामचंद्र मेजारी, रुपेश दत्तात्रय मेजारी, प्रणय प्रभाकर मेजारी , सुधाकर दत्तात्रय मेजारी, दयेश सुधाकर मेजारी, दत्तप्रसाद प्रभाकर मेजारी यांनी पक्षप्रवेश केला. सरपंचपदाच्या उमेदवाराने ऐन निवडणूक प्रचाराआधीच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात केलेला पक्षप्रवेश ही कणकवली ग्रामीण क्षेत्रातील राजकीय दृष्ट्या महत्वाची घटना असल्याचे तज्ञ राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सरपंचपदाचे उमेदवार दिनेश मेजारी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसोबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात दाखल..!

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीच्या प्रचाराची सुरवात होण्याआधीच नाट्यमय घटना घडत आहेत.
सर्वात उदयोन्मुख पक्ष म्हणून नावारुपाला येणार्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्राबल्यही आता निवडणुकीच्या तोंडावर ठळकपणे दिसू लागले आहे.
ग्रा पं निवडणूक प्रचाराला सुरुवात होत असतानाच कणकवली तालुक्यातील डामरे ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंचपदाचे अपक्ष उमेदवार दिनेश सुरेश मेजारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनेश मेजारी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी कणकवली विधानसभा संघटक संदेश पटेल, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, कणकवली तालुका समन्वयक सुनील पारकर आदी उपस्थित होते.
दिनेश सुरेश मेजारी यांच्यासह सुरेश दत्तात्रय मेजारी, विजय राजाराम मेजारी, दशरथ विठोबा मेजारी, सुमित राजाराम मेजारी, लक्ष्मीकांत सुरेश मेजारी, शंकर रामचंद्र मेजारी, रुपेश दत्तात्रय मेजारी, प्रणय प्रभाकर मेजारी , सुधाकर दत्तात्रय मेजारी, दयेश सुधाकर मेजारी, दत्तप्रसाद प्रभाकर मेजारी यांनी पक्षप्रवेश केला. सरपंचपदाच्या उमेदवाराने ऐन निवडणूक प्रचाराआधीच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात केलेला पक्षप्रवेश ही कणकवली ग्रामीण क्षेत्रातील राजकीय दृष्ट्या महत्वाची घटना असल्याचे तज्ञ राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

error: Content is protected !!