मसुरे | प्रतिनिधी : मुंबईत रंगलेली ‘रंगोत्सव सेलिब्रेशन’ ही राष्ट्रीय स्तरावरील हस्ताक्षर, रंगभरण, टॅटू मेकिंग, कार्टून मेकिंग अशी कलास्पर्धा संपन्न झाली. मुंबईतील मुलुंडच्या सुप्रसिद्ध ‘रंगोत्सव संस्थेमार्फत’ ही स्पर्धा आयोजित केली गेली होती.
या स्पर्धेत केंद्र शाळा मसुरे क्र. १ च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांनी भरीव यश मिळवले
हस्ताक्षर स्पर्धेत श्रेया प्रदीप मगर.
आर्ट मेरिट अवॉर्ड
संचिता संतोष जाधव (सुवर्णपदक.)
रंगभरण स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते : निधी दीपक पेडणेकर,
यशश्री गुरुनाथ ताम्हणकर, श्रुती लक्ष्मण लाड, क्रिषा स्वप्निल दुखंडे तर रौप्यपदक विजेते ठरले
कु.उर्वी उमेश खराबी, वैष्णवी सुरेश चव्हाण, समर्थ महादेव शिंगरे, अमेय बाळकृष्ण मेस्त्री आणि ब्राॅंझ पदक विजेता
असद नासिर पटवेकर ठरला.चित्रकला स्पर्धेत संचिता संतोष जाधवला सुवर्णपदक मिळाले.
टॅटू मेकिंग स्पर्धेत संचितालाच कांस्यपदक प्राप्त झाले.कार्टून मेकिंग स्पर्धेत कु. नेहा महादेव शिंदेला कांस्यपदक मिळाले.
वरील सर्व यशस्वी स्पर्धकांना चषक, मेडल, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना विनोद कदम आणि शाळेतील सर्व शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कला क्षेत्रातून व मसुरे गावातून विशेष कौतुक होत आहे.