क्रीडा | वृत्तसंस्था : आज ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पाॅन्टिंग याला विंडिज विरुध्दच्या पर्थ कसोटी दरम्यान अत्यावस्थ होत त्याची तब्येत खालावल्याने व चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल केले गेले.
सध्या वेस्ट इंडिजचा संघ दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ३० नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरु आहे. या सामन्यात रिकी पाँटिंग कॉमेंट्री करत आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात तो समालोचन करत होता. यादरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. पाँटिंगसोबतची ही घटना आज कसोटीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २ डिसेंबरला घडली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज पॉन्टिंग या येत्या १९ डिसेंबरला ४८ वर्षांचा होणार आहे.
दरम्यान पाॅन्टिंगला चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोशल मिडिया वर त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे संदेश प्रसारित झाले असले तरी रुग्णालयाकडून तशी कोणतीही पुष्टी केली गेली नाही आहे. रुग्णालयातून आलेल्या हेल्थ बुलेटीन मध्ये रिकी पाॅन्टिंगची सध्याची शारिरीक स्थिती स्थीर असल्याची माहिती मिळत आहे.