25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

पाडलोस येथे चिरे वाहतुक करणारा डंपर कोसळून अपघात.

- Advertisement -
- Advertisement -

पुलाचा भाग खचल्यामुळे अपघात

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘पाडलोस माडाचेगावळ’ मोरीपुलाचा अर्धा भाग अचानक खचल्याने सुमारे दहा फूट उंचीवरून चिरे वाहतुक करणारा डंपर कोसळून अपघात झाला. पुलाचा भाग खचत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर उडी घेतली मात्र डंपरचे मोठे नुकसान झाले. तीस वर्षांपूर्वी केलेले बांधकाम कमकुवत झाले असून पूल वाहतुकीस धोकादायक बनले आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष जात नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.
बांदा-शिरोडा मुख्य रस्त्यावरून पाडलोस-माडाचेगावळ अंतर्गत रस्ता जातो. या मार्गे चिरे वाहतूक करणारा डंपर पुलावर पोहोचताच एका बाजूने पूल खचत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने स्वतःसह डंपर वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु अचानक उजव्या बाजूने डंपर उचलत असल्याचे लक्षात येताच चालकाने बाहेर उडी घेतली. या अपघातात सुदैवाने चालक तर बचावला परंतु डंपरचे मात्र मोठे नुकसान झाले. सदर घटना आज दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
माडाचेगावळ मधील ग्रामस्थांना वाडीमध्ये जाण्यासाठी याच एकमेव मार्गाचा वापर करावा लागतो. पावसाळ्यात हलका जरी पाऊस पडल्यास पूल पाण्याखाली जाते. उंची वाढविण्यासाठी वारंवार मागणी करूनही याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यापूर्वीच जर पुलाची उंची वाढवून पुन्हा नव्याने काम केले असते तर असा अपघात झाला नसता असे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, उशिरापर्यंत डंपर बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

पुलाचा भाग खचल्यामुळे अपघात

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'पाडलोस माडाचेगावळ' मोरीपुलाचा अर्धा भाग अचानक खचल्याने सुमारे दहा फूट उंचीवरून चिरे वाहतुक करणारा डंपर कोसळून अपघात झाला. पुलाचा भाग खचत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर उडी घेतली मात्र डंपरचे मोठे नुकसान झाले. तीस वर्षांपूर्वी केलेले बांधकाम कमकुवत झाले असून पूल वाहतुकीस धोकादायक बनले आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष जात नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.
बांदा-शिरोडा मुख्य रस्त्यावरून पाडलोस-माडाचेगावळ अंतर्गत रस्ता जातो. या मार्गे चिरे वाहतूक करणारा डंपर पुलावर पोहोचताच एका बाजूने पूल खचत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने स्वतःसह डंपर वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु अचानक उजव्या बाजूने डंपर उचलत असल्याचे लक्षात येताच चालकाने बाहेर उडी घेतली. या अपघातात सुदैवाने चालक तर बचावला परंतु डंपरचे मात्र मोठे नुकसान झाले. सदर घटना आज दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
माडाचेगावळ मधील ग्रामस्थांना वाडीमध्ये जाण्यासाठी याच एकमेव मार्गाचा वापर करावा लागतो. पावसाळ्यात हलका जरी पाऊस पडल्यास पूल पाण्याखाली जाते. उंची वाढविण्यासाठी वारंवार मागणी करूनही याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यापूर्वीच जर पुलाची उंची वाढवून पुन्हा नव्याने काम केले असते तर असा अपघात झाला नसता असे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, उशिरापर्यंत डंपर बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

error: Content is protected !!