आजच अहमदाबादमध्ये पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्या ‘मेगा रोड शोजचे’ आयोजन..
मुंबई | ब्युरो न्यूज : देशातील गुजरात राज्य विधानसभेच्या ८९ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु झाले आहे.
गुजरातमधील विधानसभेच्या ८९ जागांसाठी आज (१ डिसेंबर) पहिल्या टप्प्यात मतदान होत असताना यंदा आम आदमी पक्षाने (आप) १८१ विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करुन निवडणुकीतील चुरस वाढवली आहे. गुजरातमध्ये गुरुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या जागेवरून आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी रिंगणात आहेत. ही जागा द्वारका जिल्ह्यांतर्गत येते.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली होती. यावेळी आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी यांचे भवितव्य पणाला लागले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानात या जागेची चर्चा जोरात सुरू आहे. एआयएमआयएमनेही या जागेवर आपला उमेदवार उभा केला आहे.
पहिल्या टप्प्याचे मतदान दोत असताना पंतप्रधान मोदींचा अहमदाबादमध्ये मेगा रोड शो आज होणार आहे. अहमदाबादमधील पाच विधानसभा मतदारसंघातून हा रोड शो जाणार आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६:३० पर्यंत हा रोड शो असेल. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सानंदमध्ये सकाळी १० :३० वाजता रोड शो करतील. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २ कोटींहून अधिक मतदार ८९ जागांवर मतदान करणार आहेत. कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात या जिल्ह्यांमध्ये आज मतदान होत आहे.