मुंबई | ब्यूरो न्यूज : ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्यासाठी उमेदवार किमान सातवी पास असावा, असा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने सरपंच अथवा सदस्यांचा शैक्षणिक अर्हतेबाबत आदेश जारी केला आहे. त्यानुसार, १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेली व्यक्ती सरपंच अथवा सदस्य होण्यासाठी किमान सातवी पास असणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना, सातवी पास असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र इच्छूक उमेदवारांना सादर करावे लागणार आहे. अर्थात ज्यांचा जन्म १९९५ पूर्वी झालेला असेल, त्यांना मात्र ही शैक्षणिक अट लागू नसेल.