संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित देवगड तालुकास्तरिय शालेय क्रीडा स्पर्धा २०२२मधील कबड्डी खेळाच्या स्पर्धा माध्यमिक विद्यामंदिर साळशी हायस्कूलच्या मैदानावर उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेचे उध्दघाटन साळशी ग्रामपंचायतीचे सरपंच वैभव साळसकर, स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत, माजी प.स. सदस्य सुनील गावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले .यावेळी संस्था पदाधिकारी ,मुख्याध्यापक माणिक वंजारे, सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आदी उपस्थित होते या क्रीडा प्रकारातील कबड्डी खेळाच्या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या स्पर्धेतील विजेत्या शाळा वयोगटानुसार पुढील प्रमाणे,१४ वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये नारिंगे हायस्कूल प्रथम ,वाडा हायस्कूल द्वितीय, फणसगाव हायस्कूल तृतीय क्रमांक मिळाला. मुलगेमध्ये शिरगाव हायस्कूल प्रथम, नारिंगे हायस्कूल द्वितीय, तळेबाजार हायस्कूल तृतीय क्रमांक मिळाला.
१७ वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये फणसगाव हायस्कूल प्रथम शिरगाव हायस्कूल द्वितीय, पेंढरी हायस्कूल तृतीय क्रमांक मिळाला.मुलगेमध्ये जामसंडे हायस्कूल प्रथम, मोंड हायस्कूल द्वितीय ,फणसगाव हायस्कूल तृतीय क्रमांक मिळाला.
१९ वर्षांखालील वयोगटात मुलींमध्ये फणसगाव हायस्कूल प्रथम, शिरगाव हायस्कूल द्वितीय ,पंतवालावलकर कॉलेज देेवगड तृतीय क्रमांक मिळाला.मुलगे मध्ये शिरगाव हायस्कूल प्रथम, देवगड हायस्कूल द्वितीय ,मोंड हायस्कूल तृतीय क्रमांक मिळाला.
त्या स्पर्धेत सुनील तळेकर, दीपक चव्हाण, अनिकेत पारकर, प्रसाद हळदिवे, शुभम नार्वेकर ,सागर फडके बाळासाहेब ढेरे, रुपेश बांदेकर आकाश पारकर या शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले.
तसेच या क्रीडा स्पर्धेचे क्रिडा समन्वयक म्हणून उत्तरेशवर लाड यानी तसेेच या स्पर्धेचे क्रिडा प्रमुख म्हणून पुरुषोत्तम साटम यांनी काम पाहिले.