27.6 C
Mālvan
Wednesday, December 4, 2024
IMG-20240531-WA0007

सोनू सावंत मित्रमंडळाच्या महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम कौतुकास्पद – राजन तेली.

- Advertisement -
- Advertisement -

तब्बल २२ तज्ञ डॉक्टर महाआरोग्य शिबिराला लावली उपस्थिती ; ५०० रुग्णांची तपासणी.

कणकवली | प्रतिनिधी :
सोनु सावंत मित्रमंडळाच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिरासाठी सर्व डॉक्टर उपस्थित होते. सोनु सावंत मित्रमंडळाच्या महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी आमदार,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.तसेच सोनू सावंत चांगले काम करत आहे,त्याला सहकार्य करा.त्याच्या पाठीशी रहा,असे आवाहन त्यांनी केले.
वरवडे येथील आयडियल इंग्लिश स्कूल येथे सोनू सावंत मित्र मंडळ आयोजित महा आरोग्य शिबिरात ते बोलत होते.शिबिराचे उद्घाटन डॉ. सविता तायशेटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी मेडिकल कौन्सिल चे सब रजिस्टार राजाराम सावंत,डॉ.विद्याधर तायशेटे,डॉ. सूर्यकांत तायशेटे, डॉ बी. जी. शेळके,भाजप तालुका अध्यक्ष संतोष कानडे,माजी उपसभापती महेश गुरव,पंचायत समिती सदस्या राधिका सावंत,पत्रकार भगवान लोके,राजन चव्हाण,सरपंच भाई बांदल,पिसेकामते सरपंच सुभाष राणे, बिडवाडी सरपंच संदीप चव्हाण, आशिये उपसरपंच संदीप जाधव,माजी सरपंच शंकर गुरव, प्रविण ठाकुर ,ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गावडे आदींसह सर्व डॉक्टर उपस्थित होते.
राजन तेली म्हणाले,कोरोना काळात येथील डॉक्टरांनी खूप चांगले काम केले आहे.आपल्याकडे दोन मेडिकल कॉलेज झाले आहे,हे आपल्या साठी महत्वाचे आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण व केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून काम केलं जातं आहे.

संतोष कानडे म्हणाले,आरोग्य शिबिर हा चांगला उपक्रम आयोजित केला आहे,हे आरोग्य शिबिर लोकहिताचे आहे.या शिबिरात अनेकांना लाभ होईल. डॉ.विद्याधर तायशेटे यांनी ,सोनू सावंत यांचे काम चांगले आहे.आमच्या स्कूलमध्ये हा कार्यक्रम घेत सेवा करण्यासाठी संधी दिली.
सोनू सावंत यांनी,प्रत्येक घरात आजाराचे प्रमाण वाढलेले आहे.आपल्या जीवनात प्रत्येकाला करीयर करताना प्रकृतीकडे दुर्लक्ष होतो.त्याचे परिणाम ५० वर्षानंतर दिसून येत असतात.आपले आजार लपवून ठेवू नका,त्याचे परिणाम वाईट असतात. आजारपणामळे मानसिक स्वास्थ बिघडले जाते.व्यायाम व आहार आपल्या सर्वांनी घेतला पाहिजे.समाजात वावरताना मी देणं लागतो,म्हणून आमचं हे महाआरोग्य शिबिर असल्याचे सांगितले.
सोनू सावंत मित्रमंडळ आयोजित आरोग्य शिबिरात हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग डॉ. सूर्यकांत तायशेटे, डॉ.बी.जी. शेळके, डॉ. राम मेनन,सर्जरी विभाग डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. संदीप सावंत, डॉ. महेंद्र आचरेकर ,ऑर्थो विभाग डॉ. निलेश पाकळे, डॉ. शरण चव्हाण,स्त्री रोग विभाग डॉ. ए .आर .नागवेकर, डॉ.सौ .अश्विनी नेवरे, डॉ.सौ.आचरेकर, डॉ. विशाखा पाटील,बालरोग विभाग डॉ. प्रशांत मोघे, डॉ. आदित्य शेळके,नेत्र विभाग डॉ. प्रसाद गुरव, कान नाक घसा विभाग डॉ.सौ. प्रीता नायगावकर, डॉ. ओंकार वेदक,दंतरोग विभाग डॉ. स्वप्नील राणे, डॉ. धैर्यशील राणे यांनी सेवा दिली.तर शिबिरात रक्त तपासणी, रक्तदाब पल्स,एचबी,युरीन, संबंधित टेस्ट तसेच ईसीजी सुद्धा मोफत करण्यात आलेत.सूत्रसंचालन हेमंत पाटकर यांनी केले.
महा आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी अमोल बोंद्रे, प्रदीप घाडीगावकर ,शिरील फर्नांडिस, हनुमंत बोंद्रे, स्वप्निल अपराज, राजेश कोदे, विजय कोदे, बाबू अपराज, विजय कदम ,अनिल घाडीगावकर, सादिक कुडाळकर ,दिनेश अपराज ,केतन घाडीगावकर, दशरथ घाडीगावकर, रियाज खान, अण्णा साटम, किरण सावंत, संतोष पुजारी, प्रशांत देसाई, निलेश देसाई ,नवीन वरवडेकर ,सचिन घाडीगावकर ,
इमरान निशाणदार, राजू कदम, अक्रम शेख ,रमजान खोत, हसन खोत, महेश कदम, आजीम कुडाळकर ,बाळा मेस्त्री, मंगेश मेस्त्री, जयू धुमाळे, निलेश सावंत, भाई बोंद्रे, सोहेल खान ,दादा अपराज, प्रथमेश वरवडेकर ,सिद्धी वरवडेकर, विशाल कासले, रुपेश वरवडेकर, अमित वरवडेकर ,प्रकाश परब ,संदीप घाडीगावकर, यांच्यासह बहुसंख्य सोनू सावंत मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!