विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : महाराष्ट्रात २६ नोव्हेंबर २०२२ संविधान दिवस ते ६ डिसेंबर २०२२ अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस या काळात जिल्हा व मंडळ स्थरावर साजरा करत आहोत. या अनुषंगाने आज रोजी भारतीय जनता पार्टी च्या तालुका कार्यालयात आज संविधान दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संविधानाचे पूजन करण्यात आले. तसेच ‘आपले संविधान’ या रमेश पतंगे लिखित पुस्तकाचे प्रकाशन माजी केंद्र प्रमुख श्री. आर. के. जाधव आणि जेष्ठ साहित्यिक श्री अजित वसंत राऊळ सर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री.आत्माराम बागलकर या निवॄत्त शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. संविधानाबद्दल जनजागृती करण्या साठी हा दिवस साजरा केला जातो. संविधाना मुळे देशाचे ऐक्य व एकात्मता समता टिकुन आहे. भारताचे संविधान बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे संविधान आहे. २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे. भारतीय संविधान धर्म निरपेक्ष वर आधारित आहे. समता, बंधुता, न्याय, समानता लोकरीत, स्वातंत्र्य संविधानाने बहाल केलेले आहे. प्रतेक माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले. बाबासाहेबाना संविधानाचे जनक म्हणतात. असे विचार श्री. आर . के . जाधव यांनी मांडले. या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , ता. अध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष सौ. सुषमा प्रभू खानोलकर, ता.सरचिटनीस प्रशांत प्रभू खानोलकर व श्री. बाबली वायंगणकर, बुथ अध्यक्ष शेखर काणेकर, सौ. व्रुन्दा गवंडळकर, सौ. श्रेया मयेकर, युवा मोर्चाचे दशरथ गडेकर, वसंत तांडेल, मनवेल फर्नांडीस, भूषण सारंग, प्रणव वायंगणकर, शशी करंगुटकर इत्यादी उपस्थित होते.