26.8 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

तरंदळे रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान..!

- Advertisement -
- Advertisement -

खोतवाडी येथे आयोजीत झाले रक्तदान शिबीर.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरंदळे खोतवाडीतील श्री वशिक मर्यादा जागृत देवस्थान ट्रस्ट च्या वतीने आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष बाब म्हणजे २ दुर्मिळ रक्तदात्यांनी व २ महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना मंदिर ट्रस्टने या पद्धतीचा अभिनव उपक्रम आयोजित केल्याबद्दल गौरवोद्गार काढले तसेच भविष्यातही या प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सावंत, ट्रस्ट अध्यक्ष संतोष गंगाराम सावंत, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील प्रमुख डॉ. तपसे, तरंदळे उपसरपंच संदेश सावंत, सामाजिक आरोग्य अधिकारी डाॅ.विद्या रासम,परिचारिका सौ.माईणकर व जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांचे प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ. पद्मश्री हळदणकर यांसह ट्रस्ट विश्वस्थ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प तसेच मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

खोतवाडी येथे आयोजीत झाले रक्तदान शिबीर.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरंदळे खोतवाडीतील श्री वशिक मर्यादा जागृत देवस्थान ट्रस्ट च्या वतीने आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष बाब म्हणजे २ दुर्मिळ रक्तदात्यांनी व २ महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना मंदिर ट्रस्टने या पद्धतीचा अभिनव उपक्रम आयोजित केल्याबद्दल गौरवोद्गार काढले तसेच भविष्यातही या प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सावंत, ट्रस्ट अध्यक्ष संतोष गंगाराम सावंत, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील प्रमुख डॉ. तपसे, तरंदळे उपसरपंच संदेश सावंत, सामाजिक आरोग्य अधिकारी डाॅ.विद्या रासम,परिचारिका सौ.माईणकर व जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांचे प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ. पद्मश्री हळदणकर यांसह ट्रस्ट विश्वस्थ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प तसेच मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

error: Content is protected !!