28 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

कणकवली पर्यटन महोत्सव २०२३ ची घोषणा ; भरगच्च कार्यक्रमांनी भरलेला महोत्सव.

- Advertisement -
- Advertisement -

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली घोषणा ; ५ जानेवारी ठरली तारीख.

चित्ररथ, फुड फेस्टीवल, हिंदी कलाकार व मान्यवर कलावंत ठरणार आकर्षण..!

कणकवली | प्रतिनिधी : आमदार नितेश राणे व नगराध्यक्ष समीर नलावडे व सहकारी यांच्या माध्यमातून कणकवली पर्यटन महोत्सव ५ जानेवरी ते ८ जानेवारी या चार दिवसांत होणार असल्याची घोषणा कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली.
गेली दोन वर्षे कोविड असल्याने महोत्सव होऊ शकला नव्हता.
या पर्यटन महोत्सवाची सुरवात ५ जानेवारीला भव्य शोभायात्रेने होईल, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
“ह्या महोत्सवाला कणकवली नगरपंचायत निधीतून एकही रुपयांचा निधी घेतला जाणार नाही तर हा महोत्सव आमदार नितेश राणे व आमच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे “, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासह उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, अण्णा कोदे, विराज भोसले, संदीप नलावडे, किशोर राणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

त्या निमित्ताने ४ जानेवारीला लहान व मोठ्या मुलांच्या चित्रकला स्पर्धा नगरवाचनालय हॉल येथे होणार आहे. या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नामांनद मोडक यांच्याशी संपर्क साधावा तसेच या महोत्सवात स्टॉल साठी गटनेते संजय कामतेकर यांच्याकडे संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.
५ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रा व चित्ररथ पटकीदेवी मंदिर ते ढालकाठी मार्गे, नाका आप्पासाहेब चौक ते महोत्सव स्थळापर्यंत उप जिहा रुणालय समोरील मैदानापर्यंत जातील. १७ चित्ररथ सहभागी चित्ररथांना प्रत्येकी १०,००० रुपये मदत करण्यात येणार आहे. कार्यक्रम स्थळी फुड फेस्टीवल उदघाटन नगरपंचायत कणकवली व रोटरी क्लब यांच्या समवेत कार्यक्रम संध्याकाळी ६:३० वाजता होणार आहे. या दरम्यान चित्रकला स्पर्धेतील चित्रांचे प्रदर्शन होणार आहे.
कणकवली पर्यटन महोत्सव २०२३ कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार डाॅ. निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत संध्याकाळी ०७:३० वाजता होणार आहे.
रात्री ८ वाजता मुंबई येथील ऑर्केस्ट्रा आणि टी.व्ही. मधील कलाकारांचा धमाल कॉमेडी शो होणार आहे.
तिसऱ्या दिवशी ६ जानेवारीला फॅशन शो हा ६ ते ८ वाजताच्या दरम्यान तर लहान १५ वर्षाखालील मुलांचे कार्यक्रम होतील.
रात्री ८ वाजाता ‘आम्ही कणकवलीकर’ कणकवली शहरातील व आजुबाजुच्या परिसरातील भरगच्च २०० नामवंत कलाकारांसहीत संगीत, नृत्य व कॉमेडी असा रंगीत कार्यक्रम सुहास वरुणकर, संजय मालंडकर व प्राध्यापक हरीभाऊ भिसे यांच्या संकल्पनेतून साकारलेला कार्यक्रम होईल असे समीर नलावडे यांनी स्पष्ट केले आहे.
७ जानेवारीला तिसऱ्या दिवशी मराठी कलाकारांचा कॉमेडी एक्सप्रेस कार्यक्रम व संगीत रजनी (म्युझिकल नाईट) ८ वाजता होणार आहे. शेवटच्या दिवशी ८ जानेवारीला कणकवली पर्यटन महोत्सव २०२३ कार्यक्रमाचा समारोप समारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, आमदार नितेश राणे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्यानंतर हिंदी कलाकारांचा व सेलिबेटींच्या उपस्थितीत लाईव्ह ऑर्केस्ट्रा कार्यक्रम सांय ८ वाजता होणार आहे, असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.

भरगच्च अशा कणकवली पर्यटन महोत्सव २०२३ च्या घोषणेनंतर कणकवली व जिल्ह्यातील इतर भागातही या पर्यटन महोत्सवाची उत्सुकता वाढली आहे.

( फोटो सौजन्य – कणकवली ब्यूरो)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली घोषणा ; ५ जानेवारी ठरली तारीख.

चित्ररथ, फुड फेस्टीवल, हिंदी कलाकार व मान्यवर कलावंत ठरणार आकर्षण..!

कणकवली | प्रतिनिधी : आमदार नितेश राणे व नगराध्यक्ष समीर नलावडे व सहकारी यांच्या माध्यमातून कणकवली पर्यटन महोत्सव ५ जानेवरी ते ८ जानेवारी या चार दिवसांत होणार असल्याची घोषणा कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली.
गेली दोन वर्षे कोविड असल्याने महोत्सव होऊ शकला नव्हता.
या पर्यटन महोत्सवाची सुरवात ५ जानेवारीला भव्य शोभायात्रेने होईल, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
"ह्या महोत्सवाला कणकवली नगरपंचायत निधीतून एकही रुपयांचा निधी घेतला जाणार नाही तर हा महोत्सव आमदार नितेश राणे व आमच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे ", अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासह उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, अण्णा कोदे, विराज भोसले, संदीप नलावडे, किशोर राणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

त्या निमित्ताने ४ जानेवारीला लहान व मोठ्या मुलांच्या चित्रकला स्पर्धा नगरवाचनालय हॉल येथे होणार आहे. या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नामांनद मोडक यांच्याशी संपर्क साधावा तसेच या महोत्सवात स्टॉल साठी गटनेते संजय कामतेकर यांच्याकडे संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.
५ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रा व चित्ररथ पटकीदेवी मंदिर ते ढालकाठी मार्गे, नाका आप्पासाहेब चौक ते महोत्सव स्थळापर्यंत उप जिहा रुणालय समोरील मैदानापर्यंत जातील. १७ चित्ररथ सहभागी चित्ररथांना प्रत्येकी १०,००० रुपये मदत करण्यात येणार आहे. कार्यक्रम स्थळी फुड फेस्टीवल उदघाटन नगरपंचायत कणकवली व रोटरी क्लब यांच्या समवेत कार्यक्रम संध्याकाळी ६:३० वाजता होणार आहे. या दरम्यान चित्रकला स्पर्धेतील चित्रांचे प्रदर्शन होणार आहे.
कणकवली पर्यटन महोत्सव २०२३ कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार डाॅ. निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत संध्याकाळी ०७:३० वाजता होणार आहे.
रात्री ८ वाजता मुंबई येथील ऑर्केस्ट्रा आणि टी.व्ही. मधील कलाकारांचा धमाल कॉमेडी शो होणार आहे.
तिसऱ्या दिवशी ६ जानेवारीला फॅशन शो हा ६ ते ८ वाजताच्या दरम्यान तर लहान १५ वर्षाखालील मुलांचे कार्यक्रम होतील.
रात्री ८ वाजाता 'आम्ही कणकवलीकर' कणकवली शहरातील व आजुबाजुच्या परिसरातील भरगच्च २०० नामवंत कलाकारांसहीत संगीत, नृत्य व कॉमेडी असा रंगीत कार्यक्रम सुहास वरुणकर, संजय मालंडकर व प्राध्यापक हरीभाऊ भिसे यांच्या संकल्पनेतून साकारलेला कार्यक्रम होईल असे समीर नलावडे यांनी स्पष्ट केले आहे.
७ जानेवारीला तिसऱ्या दिवशी मराठी कलाकारांचा कॉमेडी एक्सप्रेस कार्यक्रम व संगीत रजनी (म्युझिकल नाईट) ८ वाजता होणार आहे. शेवटच्या दिवशी ८ जानेवारीला कणकवली पर्यटन महोत्सव २०२३ कार्यक्रमाचा समारोप समारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, आमदार नितेश राणे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्यानंतर हिंदी कलाकारांचा व सेलिबेटींच्या उपस्थितीत लाईव्ह ऑर्केस्ट्रा कार्यक्रम सांय ८ वाजता होणार आहे, असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.

भरगच्च अशा कणकवली पर्यटन महोत्सव २०२३ च्या घोषणेनंतर कणकवली व जिल्ह्यातील इतर भागातही या पर्यटन महोत्सवाची उत्सुकता वाढली आहे.

( फोटो सौजन्य - कणकवली ब्यूरो)

error: Content is protected !!