उपक्रमशील शिक्षक प्रफुल्ल जाधव यांना देण्यात येणार पुरस्कार.
२७ नोव्हेंबरला कणकवलीत होणार पुरस्काराचे वितरण.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील सदाशिव पवार स्मृती प्रतिष्ठानचा २०२२ सालचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा रविवारी २७ नोव्हेंबरला र कणकवली नगरवाचनालय सभागृहात सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यंदा या पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. वैभववाडी तालुक्यातील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे येथील उपक्रमशील शिक्षक प्रफुल्ल तुकाराम जाधव यांना शिक्षक दिनादिवशी हा आदर्श पुरस्कार जाहीर झाला. रोख रक्कम पाच हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार असून वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जि.प.उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाला शिक्षण प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश पवार, सचिव शुभांगी पवार यांनी केले आहे.
डाॅ.सतिश पवार आणि कुटुंबियांनी त्यांचे वडिल सदाशिव पवार गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या प्रतिष्ठान मार्फत समाजातील उपक्रमशील व्यक्तिमत्वांची वेळोवेळी दखल घेत सन्मान केलेला आहे व हा पुरस्कार त्याचाच एक शैक्षणिक मानबिंदू आहे.