20.9 C
Mālvan
Monday, January 6, 2025
IMG-20240531-WA0007

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या जिल्ह्यात सदिच्छा भेटी .

- Advertisement -
- Advertisement -

अनेक ठिकाणी झाले जोरदार स्वागत.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सावंतवाडी येथे विधान परिषद शिक्षक मतदार संघाचे कोकण विभागाचे  उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा जिल्ह्यात सदिच्छा भेट दौरा सलग दुसर्‍या दिवशी उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू उमेदवार म्हणून म्हात्रे यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा’ या उक्ती प्रमाणे सर्वच शिक्षक बांधवांनी यावेळी उत्साह दर्शवला. दरम्यान दिवसभर कार्यकर्त्यांचा उत्साह जोरदार पहायला मिळाला. प्रत्येक शाळेतील उपस्थित शिक्षकांनी म्हात्रे यांचे जोरदार स्वागत केले. म्हात्रे यांनी प्रत्येक ठिकाणी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.

शिक्षण क्षेत्रातील  प्रश्न आणि भेडसावणाऱ्या समस्यांची जाण त्याच क्षेत्रातल्या व्यक्तीला माहीत असतात.  सदर प्रश्न आणि समस्या तो आपले म्हणुनच सोडवतो कारण त्या व्यक्तीने जवळून पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या असतात. म्हात्रे यांनी हजारो शिक्षकांचे प्रश्न स्वतः पुढाकार घेऊन सोडविले आहेत. प्रसंगी 250 पेक्षा जास्त आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आणि अधिकारांसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे विधान परिषदेत पोहचणे गरजेचे आहे जेणेकरून आपला हक्काचा माणूस आपल्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच हजर राहील व अनेक प्रश्न विधान परिषदेत मांडेल. शेवटी उपस्थित शिक्षकांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना शिक्षक आमदार म्हणून निवडून देण्याचा निर्धार केला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

अनेक ठिकाणी झाले जोरदार स्वागत.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सावंतवाडी येथे विधान परिषद शिक्षक मतदार संघाचे कोकण विभागाचे  उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा जिल्ह्यात सदिच्छा भेट दौरा सलग दुसर्‍या दिवशी उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू उमेदवार म्हणून म्हात्रे यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

'शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा' या उक्ती प्रमाणे सर्वच शिक्षक बांधवांनी यावेळी उत्साह दर्शवला. दरम्यान दिवसभर कार्यकर्त्यांचा उत्साह जोरदार पहायला मिळाला. प्रत्येक शाळेतील उपस्थित शिक्षकांनी म्हात्रे यांचे जोरदार स्वागत केले. म्हात्रे यांनी प्रत्येक ठिकाणी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.

शिक्षण क्षेत्रातील  प्रश्न आणि भेडसावणाऱ्या समस्यांची जाण त्याच क्षेत्रातल्या व्यक्तीला माहीत असतात.  सदर प्रश्न आणि समस्या तो आपले म्हणुनच सोडवतो कारण त्या व्यक्तीने जवळून पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या असतात. म्हात्रे यांनी हजारो शिक्षकांचे प्रश्न स्वतः पुढाकार घेऊन सोडविले आहेत. प्रसंगी 250 पेक्षा जास्त आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आणि अधिकारांसाठी ज्ञानेश्वर म्हात्रे विधान परिषदेत पोहचणे गरजेचे आहे जेणेकरून आपला हक्काचा माणूस आपल्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच हजर राहील व अनेक प्रश्न विधान परिषदेत मांडेल. शेवटी उपस्थित शिक्षकांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना शिक्षक आमदार म्हणून निवडून देण्याचा निर्धार केला.

error: Content is protected !!