पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा व रवळनाथ मंदिर ट्रस्ट तर्फे श्री शांतादुर्गा देवीचा वार्षिक जत्रोत्सव दि. १३ ते २० जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त दि. १३ रोजी सायंकाळी चार वाजता श्री देव रवळनाथ मंदिर येथून तरंग खांबकाठी सहित बाहेर पडणार आहेत, पाच वाजता श्री देवी शांतादुर्गा मंदिर येथे पाच दिवसांसाठी वस्तीला राहतील, सात वाजता ग्रामस्थांना चुलपट्टी महाप्रसाद देण्यात येईल, रात्री १० वाजता पोतीपुराण ब्राह्मणामार्फत वाचण्यात येईल. ११ वाजता मंदिरातून पालखी बाहेर काढून मंदिरा सभोवताली एक प्रदक्षिणा झाल्यावर पुन्हा पालखी मंदिरात येईल. त्यानंतर ओटी भरणे लगेच दिवटीला तेल घालण्याचा कार्यक्रम करून गोंधळाला सुरुवात करण्यात येणार आहे. १४ रोजी सकाळी ९ वाजता ओटी भरणे, रात्री १० वाजता पोतीपुराण वाचन व नंतर गोंधळ, १५ रोजी सकाळी ९ वाजता ओटी भरणे, रात्री १० वाजता पोतीपुराण वाचन, ११ वाजता पालखी सोहळा, १ वाजता दशावतार नाट्यप्रयोग, चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ कवठी, १६ रोजी सकाळी ९ वाजता ओटी भरणे, रात्री १० वाजता पोतीपुराण वाचन व नंतर गोंधळ कार्यक्रम होणार आहे. दि. १७ रोजी सकाळी ९ वाजता ओटी भरणे, रात्री १० वाजता पोतीपुराण वाचन, ११ वाजता पालखी सोहळा व नंतर गोंधळ. १८ रोजी दुपारी ३ वाजता तरंग खांबकाठीसह भेटीसाठी श्री देव क्षेत्रफळ, नवपाटवाडी येथे वस्तीला. १९ रोजी दुपारी ३ वाजता तरंग खांबकाठीसह श्री देव क्षेत्रफळ नवपाटवाडी येथून भैरववाडी भैरवदेव येथे वस्तीला राहतील. २० रोजी दुपारी ३ वाजता भैरववाडी भैरवदेव येथून तरंग खांबकाठी सहित निघून पुन्हा रवळनाथ मंदिर येथे निरी सोडणेसाठी विसर्जनासाठी येतील. भाविकांनी या जत्रोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे

वडाचापाट येथील श्री शांतादुर्गा देवीचा जत्रोत्सव.
36
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -