बांदिवडेच्या काळीमिरी प्रकल्पात, मसुरे विद्यार्थ्यांचे आगळेवेगळे वनभोजन.
श्रावण | गणेश चव्हाण : शालेय वनभोजन हा आनंददायी, मनप्रसन्न करुन, सतत स्मरणीय व आरोग्यदायी एक क्षण. या क्षणाची विद्यार्थ्यांसह शिक्षकही वाट पहात असतात. या क्षणांच्या आठवणी, शालेय जिवणासह पुढे कायम सुख देतात. अशाच आगळ्या वेगळ्या वनभोजनाचा आस्वाद मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलीत, आर. पी. बागवे हायस्कुल व भरतगड हायस्कुल च्या विद्यार्थ्यांनी, उद्योजक व बांदीवडे पॅटर्न नाविण्यपुर्ण प्रकल्पाचे प्रनेते मिलिंद प्रभु यांच्या काळीमिरी प्रकल्पात घेतला.
फक्त वनभोजन असाच उपक्रम न करता काळीमिरी प्रकल्प, काळी मिरीचा आरोग्य लाभ, कमी जागेत जास्त फायदा व आर्थिक फायदा याचे ज्ञान मिलिंद प्रभु यांनी विद्यार्थी व शिक्षकांना दिले.
यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्पुर्त पणे एकांकीका, नाच, गाणी व कविता वाचन तसेच बैठे खेळ यांचा आनंद लुटला. शिक्षक दयानंद पेडणेकर यांनी आपल्या सुरेल आवाजात सर्वांची मने जिंकुन आनंद दिला. आणि
अतीशय आनंदात वनभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मिरी प्रकल्पाचे मिलींद प्रभु, शुभलक्ष्मी नर्सरीच्या सौ. शुभा प्रभु, माजी मुख्याद्यापीका श्रीम. सुनिता प्रभु, रंजन प्रभु, ठेकेदार अरुण भट, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, भरतगड हायस्कुल शाळा समिती अध्यक्ष श्री लाकम, सदस्य पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर, आर. पी. बागवे हायस्कुलचे मुख्याद्यापक के. ए. चव्हाण, भरतगड हायस्कुलचे मुख्याद्यापक एस. आर कांबळे, दोन्ही हायस्कुलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार झुंजार पेडणेकर, दै. पुढारीचे गणेश चव्हाण, व दोन्ही हायस्कुलचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमांसाठी श्री आकेरकर गुरुजी, जाधव सर, व्यावसायीक उदय सावंत, सौ. प्रियांका सावंत, सौ. रिया माळकर, सौ. सुष्मा परब, सौ. मयुरी राणे, सौ. शिला परब, सौ. सरीता त्रिंबककर यांनी मोलाचे सहकार्य केले.
मुख्या. के. ए. चव्हाण यांनी मिलींद प्रभु कुटुंबासह सर्वांचे आभार मानले.