मसुरे | प्रतिनिधी :
कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदीर येथे सोमवार ७ नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने सकाळी ७ वाजता श्री भरतेश्वराची विधीवत पूजा अर्चा, सायंकाळी ७ वाजता गावच्या रहाटी नुसार टीपर व दीप प्रज्वलन, मनाकऱ्यांना दीप वाटप, रात्रौ ९ वाजता दीपोत्सव सोहळा, रात्रौ १० वाजता शाही पालखी सोहळा, रात्रौ १२ वाजता तेंडोलकर दशावतार मंडळाचा “आला सत्वरी भक्त कैवारी” हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता गाडगा फोडणे व दह्याचा काला. सकाळी ६ वाजता श्रीची पालखी मिरवणूक, रमाई नदीपात्रात श्रीचे अभ्यंग स्नान तदनंतर शक्तीपीठ श्री देवी माऊली मंदिर येथे श्री भरतेश्र्वराची शिव शक्ती भेट सोहळा, तदनंतर माऊली मंदीर ते भरतेश्र्वर मंदिरपर्यत पालखीचे प्रस्थान. असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन मानकरी आणि ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.