‘ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ‘ कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांची मागणी.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकांना दर महिन्याला मिळणारी पेन्शन वेळेत देण्यात यावी अशी मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक प्राथमिक शिक्षण विभाग आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकांना दर महिन्याला मिळणारे सेवा निवृत्ती वेतन (पेन्शन) हे गेले काही महिने अनियमितपणे मिळत आहे.त्यामुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना अनेक समस्या निर्माण होत आहेत.दिवाळी तोंडावरती आली तरी अध्याप प्रत्येकाच्या खात्यावरती जमा होणारी पेन्शन जमा झालेली नाही.तरी ती त्याच्या खात्यात दिवाळीपूर्वी पेन्शन जमा करून दिवाळीचा सन आनंदात साजरा व्हावा.तसेच प्रत्येक महिन्यात सर्व सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या खात्यात जमा होणारी पेन्शनची रक्कम ही प्रत्येक महिन्याच्या १ ते १० तारखेपर्यंत जमा करण्यात यावी अशा प्रकारची मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.