श्रावण | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील श्रावण गावामध्ये महात्मा गांधी विद्यालय श्रावण क्रमांक ०१ या प्रशालेत दर वर्षीप्रमाणे श्री देवी सरस्वती पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यानिमित्त सकाळी पहिल्या सत्रात सरस्वती आवाहन ब्राह्मणांच्या हस्ते वेदमंत्र पूजापाठ, आरती, तीर्थप्रसाद, ग्रामस्थांची भजने, विद्यार्थीनी व गावातील महिलांच्या फुगड्या, भजने, दांडिया कार्यक्रम झालेत. त्यानंतर कै. प्रभाकर नारायण परब यांच्या स्मरणार्थ त्यांची कन्या योगिता सुनील परब व प्रतिक्षा संदेश वाघमारे यांनी दिलेला आदर्श विद्यार्थी पुरस्कार अथर्व संतोष गवळी तर आदर्श विद्यार्थीनी रेवती सुनील लाड तर आदर्श पालक सतीश लक्ष्मण बाईत यांना पारितोषिक व पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार सरपंच प्रशांत परब, श्रावण सोसायटीचे चेअरमन दुलाजी परब, सदस्य प्रमोद घाडी, दिपक घाडी, रागिणी पवार, सुप्रिया यादव, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शिवराम परब, पोलीस पाटील धाकू दळवी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
त्यानंतर रात्री ठीक नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात, इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम उत्कृष्ट प्रकारे संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, अंधश्रद्धा निर्मुलन, आरोग्य या विविध विषयांवर समाज प्रभोधन करत, नाच, गाणी, रेकॉर्ड डान्स तसेच नाटिका, एकांकिका यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. यासाठी गावातील दानशूरांनी, मोठ्या प्रमाणावर बक्षीस देऊन मुलांना प्रोत्साहीत केले.
यामध्ये शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शिवराम परब आणि मुख्याध्यापक सौ. स्मिता किंजवडेकर तसेच सरपंच प्रशांत परब यांच्या मार्गदर्शनाखाली, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीम. रागिणी ठाकूर तसेच विनायक हरकुळकर यांच्या उत्कृष्ठ नियोजनाने कार्यक्रम यशस्वी झाला. यामध्ये विनायक हरकुळकर सर यांनी मोठी मेहनत घेऊन, उत्कृष्ट प्रकारे सूत्रसंचालन सादर केले. यासाठी श्रावण गांव प्रमुख दुलाजी परब आणि गावातील सर्व ग्रामस्थ रसिकांकडून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रा.पं. श्रावण, शाळा व्य. समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक शिक्षक संघ, तसेच सर्व ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी यांनी अपार मेहनत घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक सचिन घोटाळे यांनी सहकार्य करणार्या सर्वांचे आभार मानले.