संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्यावतीने कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या मान्यतेने डी.सी.स्कुल खंडाळा जि. पुणे येथे आयोजित राष्ट्रीय पंच परीक्षा प्रशिक्षण शिबिराला राज्यभरातून कराटे प्रशिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या शिबिरात सुमारे १०० पेक्षा अधिक मान्यताप्राप्त कराटे प्रशिक्षक सहभागी झाले आहेत.
प्रशिक्षकांना या शिबिरात कुमिते व काताचे प्रात्यक्षिकासह पंच प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रशिक्षणाच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव संदीप गाडे, खजिनदार संदिप वाघचौरे, वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या पंच शाहिन अख्तर,राज्य तांत्रिक समितीचे अध्यक्ष अनुप देठे,सचिव हरिदास गोविंद,सदस्य रविद्र सुर्यवंशी,जितेश नायर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी महासचिव संदीप गाडे, शाहिन अख्तर आणि अनुप देठे, हरिदास गोविंद यांनी उपस्थित प्रशिक्षकांना मार्गदर्शन करून प्रशिक्षकांनी काळाबरोबर तांत्रिक बाबतीत सातत्याने अपडेट राहण्याचे आवाहन केले.
३२जिल्ह्यातील १००पेक्षा अधिक प्रशिक्षकांचा सहभाग
या पंच परीक्षेला आठ क्रीडा विभागातील आणि ३२ जिल्ह्यातील १००पेक्षा अधिक प्रशिक्षकांनी हजेरी लावली आहे.
पहिल्या दिवशी वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या पंच शाहिन अख्तर यांचे पीपीटीद्वारे तसेच अनुप देठे यांचे मॅटवरील प्रत्यक्ष पंचाची कार्ये या विषयावर सखोल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन लाभले.