गज़लकार व साहित्यिक कै. मधुसुदन नानिवडेकर यांच्या स्मरणार्थ नव्याने उभारण्यात आलेल्या मधुकट्ट्यावरती रंगणार मैफिल.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : संवाद परिवाराच्या वतीने खास कोजागिरी पौर्णिमे निमित्ताने आज रविवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता “कोजागिरीचा चंद्र हा” ही काव्य मैफिल तळेरे येथील मधुकट्ट्यावरती आयोजित करण्यात आली आहे. पावसाळ्यामुळे संवाद परिवाराची साहित्यिक मेजवानी काही काळासाठी थांबली होती.ती पुन्हा एकदा अधिक जोमाने सुरू करण्यात येत आहे.याची सुरुवात कोजागिरी पौर्णिमेला कवींतांचा जागर करून करण्यात येणार आहे.यासाठी खास कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने “कोजागिरीचा चंद्र हा” ही काव्य मैफिल आयोजित करण्यात आली आहे.या काव्य मैफिलीमध्ये सुप्रसिद्ध लेखक,कवी श्री.प्रमोद कोयंडे,नाट्य निर्माते,लेखक व कवी श्री.संतोष टक्के आणि तळेरे येथील प्रथितयश डॉक्टर व कवी डॉ.विजय पोकळे आपल्या विविध ढंगातील आणि खुमासदार कविता सादर करुन ही काव्य मैफिलीची संध्याकाळ जागवणार आहेत.
सदरची “कोजागिरीचा चंद्र हा” ही काव्य मैफिल अर्थातच डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्या तळेरे येथील चैतन्य नर्सिंग होमच्या प्रांगणात स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या स्मरणार्थ नव्याने उभारण्यात आलेल्या मधुकट्ट्यावरती रंगणार आहे.तरी या खास कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या काव्य मैफिलीच्या जागरामध्ये रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन संवाद परिवाराच्या वतीने डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.