संतोष साळसकर | ब्युरोचीफ : “कराटे-दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (KAM)” च्या वतीने “कराटे इंडिया ऑर्गनायजेशन (KIO)” या राष्ट्रीय संघटनेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त कराटे प्रशिक्षकांसाठी दिनांक ८ व ९ ऑक्टोबरला कराटे प्रशिक्षण व राष्ट्रीय पंच परीक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे कराटे असोसिएशन महाराष्ट्राचे महासचिव सिहान संदीप गाडे आणि सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनचे जिल्हा सचिव दत्तात्रय मार्कंड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
“कराटे इंडिया ऑर्गनायजेशन (KIO)” या राष्ट्रीय संघटनेस साऊथ एशियन कराटे फेडरेशन, कॉमनवेल्थ कराटे फेडरेशन, एशियन कराटे फेडरेशन व वर्ल्ड कराटे फेडरेशन या संघटनांशी संलग्न सभासद असून “वर्ल्ड कराटे फेडरेशन (WKF)” या आंतरराष्ट्रीय कराटे संघटनेस इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी (IOC) ची मान्यता आहे. गतवर्षी जपान येथे आयोजित “२०२० टोकियो ऑलिम्पिक” खेळांमध्ये कराटे या खेळाचा समावेश केला गेला होता. सर्व स्पर्धा वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या तांत्रिक सहकार्याने पार पडल्या होत्या.
कराटे खेळ शालेयस्तर, विद्यापीठस्तर, पोलिस गेम्स, दक्षिण आशियायी, आशियायी, वर्ल्ड चॅम्पिअनशिप, कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा व ऑलिम्पिक स्पर्धा मध्ये समाविष्ठ खेळ आहे.
सदर शिबीर हे येत्या शनिवार व रविवार दिनांक ८ व ९ ऑक्टोबर २०२२ रोजी डी. सी. स्कूल, खंडाळा, जिल्हा पुणे येथे आयोजिन करण्यात आलेले आहे.
शिबिर हे कराटे खेळाच्या नियमावलीतील झालेल्या बदलानुसार नवीन नियमांबाबत मार्गदर्शन करण्याकरीता कराटे खेळाची आंतरराष्ट्रीय संघटना ‘वर्ल्ड कराटे फेडरेशन (WKF)’ च्या मान्यताप्राप्त पंचांच्या देखरेखीखाली होणार आहे.
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मान्यताप्राप्त असलेल्या जास्त जास्त कराटे प्रशिक्षकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबीरात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी प्रशिक्षकांनी आप आपल्या जिल्हा कराटे संघटना तसेच कराटे-दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव श्री.संदीप गाडे मोबाईल. ९८९२१५२१९७ व सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मार्कंड यांच्याशी दि. ७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेच्यातर्फे करण्यात आले आहे.