मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : साळेल येथे ‘माझा एक दिवस बळीराजासाठी ‘ हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी साळेल सरपंच श्रीमती साक्षी जाधव, उपसरपंच श्री रवींद्र साळकर, माजी प स सदस्य श्री.कमलाकर गावडे, तालुका कृषी अधिकारी श्री विश्वनाथ गोसावी, कृषी अधिकारी मालवण श्री दिनेश लंबे,
कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे, श्री एस जी परब, श्री मनीषा गीते, आत्मा व्यवस्थापक श्री निलेश गोसावी, ग्रामसेवक श्री ए जी पाटील, श्री सामाजिक गावडे श्री लक्ष्मण परब श्री बजरंग गावडे श्री भांजे गावडे श्री वसंत पडवळ श्री नारायण गावडे श्री रवींद्र गावडे इत्यादी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते उपस्थित होते
श्री विश्वनाथ गोसावी यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाची संकल्पना उपस्थित शेतकऱ्यांना विशद केली. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी त्यावर करावयाचे उपायोजना त्याची कारणे समजून घेणे याकरिता तालुकास्तरावरील एक दिवस शेतकऱ्यांसमवेत उपस्थित राहून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या. यावेळी श्री भानजी गावडे यांच्या गांडूळ युनिट ची पाहणी करून माहिती दिली. गांडूळ युनिटचा विस्तार करणे साठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गांडूळ युनिट ही बाब राबविणे बाबत तसेच उत्पादित गांडूळ खत विक्री करून आपल्या प्रपंचाला हातभार लावणे बाबत चर्चा करण्यात आली. तसेच त्यांनी लागवड केलेल्या भुईमूग पिकाची पाहणी करून सद्यस्थितीत पिकावर असलेल्या पाने खाणाऱ्या अळीचा व ठिपका रोगाबाबत पाहणी करून सविस्तर मार्गदर्शन करून फवारणी करून पीक वाचवण्याबाबत सूचित करण्यात आले. पिक प्रात्यक्षिके अंतर्गत भात पिकाची श्री लागवड ची पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.या यावेळी श्री धनंजय गावडे कृषी परिषद यांनी भात पिकावरील कीड रोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री निलेश गोसावी आत्मा व्यवस्थापक यांनी पी एफ एम इ प्रधानमंत्री सुषमा अन्न खाद्य प्रक्रिया उद्योग बाबत माहिती देऊन इच्छुक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवण्यास सुचविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कृषी सहा मनीषा गीते यांनी केले.