29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

म.वि.आ. सरकारने मच्छिमारांना ३ वर्षे झुलवत ठेवले : डाॅ.निलेश राणे.

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांनी काल भाजपा नेते कॅबिनेटमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथे भेट घेतली. ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या क्यार चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला होता. कित्येक नौकाधारक तसेच पारंपरिक रापण संघ यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले मात्र म.वि.आ. सरकार कडून आश्वासनाव्यतिरिक्त कुठल्याही ठोस स्वरूपाची मदत मच्छिमारांना झाली नव्हती. म.वि.आ. सरकारने केवळ पंचनामे करून वेळ मारून नेली आणि मच्छिमारांना झुलवत ठेवलं. आज भाजपा नेते निलेश राणे यांनी मस्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी झालेल्या विशेष वैठकीत क्यार चक्रीवादळ नुकसानभरपाईच्या विषयात सविस्तर चर्चा झाली असून मच्छिमारांना आर्थिक मदत देण्याच्या बाबतीत मंत्री महोदय सकारात्मक असल्याची माहिती निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

या चर्चेमुळे कोकणातील मच्छिमारांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून याचा फायदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ४१७६ रापण संघांना मिळणार आहे. एकट्या मालवण तालुक्यातील यात १९४ रापणसंघ आहेत जे गेली तीन वर्षे मदतीच्या प्रतीक्षेत होते असे डाॅ.निलेश राणे यांनी ट्वीटरवरुन स्पष्ट केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांनी काल भाजपा नेते कॅबिनेटमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथे भेट घेतली. ऑक्टोबर २०१९ साली झालेल्या क्यार चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला होता. कित्येक नौकाधारक तसेच पारंपरिक रापण संघ यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले मात्र म.वि.आ. सरकार कडून आश्वासनाव्यतिरिक्त कुठल्याही ठोस स्वरूपाची मदत मच्छिमारांना झाली नव्हती. म.वि.आ. सरकारने केवळ पंचनामे करून वेळ मारून नेली आणि मच्छिमारांना झुलवत ठेवलं. आज भाजपा नेते निलेश राणे यांनी मस्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी झालेल्या विशेष वैठकीत क्यार चक्रीवादळ नुकसानभरपाईच्या विषयात सविस्तर चर्चा झाली असून मच्छिमारांना आर्थिक मदत देण्याच्या बाबतीत मंत्री महोदय सकारात्मक असल्याची माहिती निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

या चर्चेमुळे कोकणातील मच्छिमारांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून याचा फायदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ४१७६ रापण संघांना मिळणार आहे. एकट्या मालवण तालुक्यातील यात १९४ रापणसंघ आहेत जे गेली तीन वर्षे मदतीच्या प्रतीक्षेत होते असे डाॅ.निलेश राणे यांनी ट्वीटरवरुन स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!