दसरा मेळाव्याला लागणार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तोरण ; उच्च न्यायलयाचा निर्णय.
न्यायालयाने सरवणकरांची मध्यस्ती याचिका फेटाळली..!
“एक नेता..एक व्यासपीठ…एक झेंडा…एक मैदान..” तत्वाचा विजय झाल्याची ठाकरे गटाची जल्लोषाची भावना.
मालवण | सुयोग पंडित : गेले महिनाभर ‘दसरा मेळावा कोणाचा’ या मुद्यावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला.
दसरा मेळाव्यासाठी ‘शिंदे गट व ठाकरे गट’ अशी सध्या चुरस सुरु झालेली होती ती आता ठाकरे गटाने जिंकल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमधील उत्साह दुणावला आहे.
हा निर्णय देताना उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेवर काही प्रश्न उपस्थित करत ताशेरे ओढले आहेत.
एक नेता..एक व्यासपीठ…एक झेंडा…एक जागा..” तत्वाचा विजय झाल्याची ठाकरे गटातील शिवसैनिकांनी भावना व्यक्त केली आहे. अनेक शिवसेना पदाधिकार्यांनी उच्च न्यायालयाचे मानले आभार.
या निर्णयाला आव्हान द्यायला शिंदे गट सर्वोच्च न्यायलयात जायचे की नाही हा निर्णय शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाईल असे शिंदे गटाचे प्रवक्ता दीपक केसरकरांनी सांगितले आहे.