25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

पाडलोस भजन स्पर्धेत स्वरधारा तांबुळी मंडळ प्रथम..!

- Advertisement -
- Advertisement -

स्पर्धेला भजनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

बांदा | राकेश परब :
पाडलोस गाव व्हाटस्ॲप ग्रुप आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे विजेतेपद तांबुळी येथील स्वरधारा भजन मंडळाने पटकाविले. द्वितीय तळवडे येथील सिद्धेश्वर उद्दीनाथ प्रासादिक भजन मंडळ तर साटेलीच्या श्री देवी माऊली भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. भजनप्रेमींचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पाडलोस गाव व्हाटस्ॲप ग्रुपतर्फे श्री रवळनाथ मंदिरात तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मडुरा तलाठी व्ही. एस. कविटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी परीक्षक दिगंबर गाड, रोहिदास परब, संगीत विशारद अमेय गावडे, पोलीस पाटील रश्मी माधव, देवस्थान समितीचे आनंद गावडे, कृष्णा करमळकर, सोसायटी चेअरमन टी. एन. शेटकर, ग्रुपचे अध्यक्ष विश्राम गावडे, उपाध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर, सचिव राजेश शेटकर, सहसचिव प्रणित गावडे, खजिनदार महेश गावडे, सहखजिनदार प्रकाश करमळकर आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – प्रथम स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ (तांबोळी), द्वितीय श्री सिद्धेश्वर उद्दीनाथ भजन मंडळ (तळवडे), तृतीय श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ (साटेली), उत्तेजनार्थ श्री स्वामी समर्थ भजन मंडळ (शेर्ला). वैयक्तिक पारितोषिके – उत्कृष्ट गायक अमित तांबुळकर (स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोळी), उत्कृष्ट हार्मोनियमवादक राजेश मोरजकर (श्री राष्ट्रोळी भजन मंडळ मडूरा), उत्कृष्ट पखवाजवादक मेहल कांडरकर (श्री सिद्धेश्वर उद्दीनाथ भजन मंडळ तळवडे), उत्कृष्ट तबलावादक अक्षय कांबळी (श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ साटेली), उत्कृष्ट झांजवादक अमित परब (विघ्नेश्वर प्रासादिक भजन मंडळ बावळाट), उत्कृष्ट कोरस (श्री राष्ट्रोळी भजन मंडळ मडूरा)

विजेत्या स्पर्धकांना अशोक गावडे व आयोजकांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत श्री राष्ट्रोळी भजन मंडळ मडुरा, श्री देवी माऊली महिला भजन मंडळ आंबोली, विघ्नेश्वर भजन मंडळ बावळाट, श्री देवी माऊली ब्राम्हणमाया मुळपुरुष भजन मंडळ विलवडे, श्री स्वामी समर्थ भजन मंडळ शेर्ला, श्री देव कलनाथ पूर्वी देवी भजन मंडळ वेत्ये, श्री देवी माऊली भजन मंडळ साटेली, श्री सिद्धेश्वर उद्दीनाथ भजन मंडळ तळवडे, श्री मुसळेश्वर भजन मंडळ मळेवाड व स्वरधारा भजन मंडळ तांबुळी असे १० संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेचे परीक्षण दिगंबर गाड (मोपा) व रोहिदास परब (विर्नोडा) यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेश शेटकर तर आभार अमेय गावडे यांनी मानले. दशक्रोशीतील शेकडो भजनप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

स्पर्धेला भजनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

बांदा | राकेश परब :
पाडलोस गाव व्हाटस्ॲप ग्रुप आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे विजेतेपद तांबुळी येथील स्वरधारा भजन मंडळाने पटकाविले. द्वितीय तळवडे येथील सिद्धेश्वर उद्दीनाथ प्रासादिक भजन मंडळ तर साटेलीच्या श्री देवी माऊली भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. भजनप्रेमींचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पाडलोस गाव व्हाटस्ॲप ग्रुपतर्फे श्री रवळनाथ मंदिरात तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मडुरा तलाठी व्ही. एस. कविटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी परीक्षक दिगंबर गाड, रोहिदास परब, संगीत विशारद अमेय गावडे, पोलीस पाटील रश्मी माधव, देवस्थान समितीचे आनंद गावडे, कृष्णा करमळकर, सोसायटी चेअरमन टी. एन. शेटकर, ग्रुपचे अध्यक्ष विश्राम गावडे, उपाध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर, सचिव राजेश शेटकर, सहसचिव प्रणित गावडे, खजिनदार महेश गावडे, सहखजिनदार प्रकाश करमळकर आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे - प्रथम स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ (तांबोळी), द्वितीय श्री सिद्धेश्वर उद्दीनाथ भजन मंडळ (तळवडे), तृतीय श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ (साटेली), उत्तेजनार्थ श्री स्वामी समर्थ भजन मंडळ (शेर्ला). वैयक्तिक पारितोषिके - उत्कृष्ट गायक अमित तांबुळकर (स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोळी), उत्कृष्ट हार्मोनियमवादक राजेश मोरजकर (श्री राष्ट्रोळी भजन मंडळ मडूरा), उत्कृष्ट पखवाजवादक मेहल कांडरकर (श्री सिद्धेश्वर उद्दीनाथ भजन मंडळ तळवडे), उत्कृष्ट तबलावादक अक्षय कांबळी (श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ साटेली), उत्कृष्ट झांजवादक अमित परब (विघ्नेश्वर प्रासादिक भजन मंडळ बावळाट), उत्कृष्ट कोरस (श्री राष्ट्रोळी भजन मंडळ मडूरा)

विजेत्या स्पर्धकांना अशोक गावडे व आयोजकांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत श्री राष्ट्रोळी भजन मंडळ मडुरा, श्री देवी माऊली महिला भजन मंडळ आंबोली, विघ्नेश्वर भजन मंडळ बावळाट, श्री देवी माऊली ब्राम्हणमाया मुळपुरुष भजन मंडळ विलवडे, श्री स्वामी समर्थ भजन मंडळ शेर्ला, श्री देव कलनाथ पूर्वी देवी भजन मंडळ वेत्ये, श्री देवी माऊली भजन मंडळ साटेली, श्री सिद्धेश्वर उद्दीनाथ भजन मंडळ तळवडे, श्री मुसळेश्वर भजन मंडळ मळेवाड व स्वरधारा भजन मंडळ तांबुळी असे १० संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेचे परीक्षण दिगंबर गाड (मोपा) व रोहिदास परब (विर्नोडा) यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेश शेटकर तर आभार अमेय गावडे यांनी मानले. दशक्रोशीतील शेकडो भजनप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

error: Content is protected !!