जलजीवन मिशन अंतर्गत कामांतील त्रुटींकडे वेधले आमदार वैभव नाईक यांनी लक्ष..!
मुंबई | ब्युरो न्यूज : जलजीवन मिशन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नळ योजनांच्या कामांमधील त्रुटींबाबत आज आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. त्रुटींमुळे सदर निविदांना ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला नसल्याची वस्तुस्थिती मांडली त्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसात या संदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
आमदार वैभव नाईक म्हणाले, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 546 नळपाणी योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. दोनवेळा निविदा प्रक्रिया राबवुन देखील केवळ १८० निविदांनाच ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला. जलजीवन मिशनची योजना जेव्हा सुरु झाली तेव्हा घाईगडबडीने अंदाजपञक केल्याने हि अंदाजपत्रके योग्य झाली नाहीत. त्याचबरोबर या योजनांसाठी १० टक्के लोकवर्गणी घेण्याची अट असल्याने या योजनांच्या निविदांना ठेकेदारांचा प्रतिसाद मिळालेला नाही.त्यामुळे उर्वरित कामांची फेर निविदा काढणार का? किंवा १० टक्के लोकवर्गणीची अट शिथिल करणार का?अथवा नवीन अंदाजपत्रक करणार का? अशी विचारणा आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात केली.जलजीवन मिशन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नळ योजनांच्या कामांमधील त्रुटी बाबत सरकारचे लक्ष वेधले. यासंदर्भात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर देत असताना दोन दिवसात या संदर्भात कार्यवाही करण्याचे आश्वासन विधानसभेत दिले अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.