26.1 C
Mālvan
Wednesday, December 18, 2024
IMG-20240531-WA0007

मंत्रीमंडळ बैठकीनंतर शिंदे सरकारची घोषणा..!!

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्यूरो न्यूज :
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणा पुढीलप्रमाणे –

वित्त विभाग :
महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
ही वाढ ऑगस्ट 2022 पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन 34 टक्के होणार आहे.

परिवहन विभाग :
पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

वैद्यकीय शिक्षण विभाग :
वैद्यकीय उपकरणे खरेदी जीईएम (GeM) पोर्टलद्धारे.
वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून करावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले.

दहीहंडी पथकातील गोविंदाला 10 लाखाचे विमा संरक्षण :
गोविंदा पथकांची शासनाने विमा कवच द्यावा अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरणेत येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
दिनांक १६ ऑगस्ट २०२२
राज्य विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सन २०२२
प्रस्तावित विधेयके व अध्यादेश
प्रस्तावित विधेयके :- ९
सभागृहाच्या पटलावर ठेवावयाचे अध्यादेश :- ६
१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२२.
२) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०२२.
३) महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश, २०२२.
४) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२२.
५) मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०२२.
६) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या ( दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२२.
प्रस्तावित विधेयके :- ९
१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२.
२) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२२.
३) महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०२२.
४) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२२.
५) मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२.
६) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२.
७) महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) विधेयक, २०२२.
८) महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२२.
९) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकार व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२२ (बाजार समित्यांमध्ये
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देण्यासाठी समितीच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी
बाजार समितीवर त्यांचे प्रतिनिधी निवडून देण्याबाबतची तरतूद करणेबाबत)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्यूरो न्यूज :
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणा पुढीलप्रमाणे -

error: Content is protected !!