25.6 C
Mālvan
Monday, November 11, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Sawant ASN
ADTV Dhondi Chindarkar ASN

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त आडवली ग्रामपंचायतच्या वतीने भरगच्च कार्यक्रम..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी :
ग्रामपंचायत आडवली मालडी यांच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त पाककला स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,वेशभूषा स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

ग्रामपंचायत मार्फत घरोघरी ध्वज वितरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायत इमारतीला विद्युत रोषणाई तसेच तिरंगी फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.13 ऑगस्टला ध्वज फडकवण्याचा मान सरपंच यांनी महिला उपसरपंच सौ .सोनाली पराडकर यांना दिला. तसेच दिनांक 14 ऑगस्टला ध्वज फडकवण्याचे अधिकार गावातील दिव्यांग व्यक्ती श्री. संजय मारुती घाडीगावकर व श्री सनीत सुधाकर पराडकर यांना देऊन वेगळा आदर्श सरपंच आडवली मालडी यांनी सर्वांसमोर ठेवला आहे.14 ऑगस्टला गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये शाळा, अंगणवाडी सर्व शासकीय कार्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. 15 ऑगस्टला ग्रामपंचायत जवळ ध्वजारोहण कार्यक्रम होणार असून त्यामध्ये सर्व शाळा अंगणवाडी सहभागी होऊन चित्ररथ सहभागी होणार आहेत. 16 ऑगस्टला कृषी आरोग्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असून दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत मानवी साखळी द्वारे आडवली तीठा येथे करण्यात येणार आहे. यावेळी उपसरपंच,सर्व सदस्य ,गाव स्तरावरील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी वर्ग, गाव स्तरावरील सर्व आजी-माजी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक ,महिला बचत गट, महिला मंडळ ,भजन मंडळे युवक मंडळे, गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते,ग्रामपंचायत कर्मचारी, रिक्षा संघटना, व्यापारी वर्ग ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी :
ग्रामपंचायत आडवली मालडी यांच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त पाककला स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,वेशभूषा स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

ग्रामपंचायत मार्फत घरोघरी ध्वज वितरण करण्यात आले आहे. ग्रामपंचायत इमारतीला विद्युत रोषणाई तसेच तिरंगी फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.13 ऑगस्टला ध्वज फडकवण्याचा मान सरपंच यांनी महिला उपसरपंच सौ .सोनाली पराडकर यांना दिला. तसेच दिनांक 14 ऑगस्टला ध्वज फडकवण्याचे अधिकार गावातील दिव्यांग व्यक्ती श्री. संजय मारुती घाडीगावकर व श्री सनीत सुधाकर पराडकर यांना देऊन वेगळा आदर्श सरपंच आडवली मालडी यांनी सर्वांसमोर ठेवला आहे.14 ऑगस्टला गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये शाळा, अंगणवाडी सर्व शासकीय कार्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. 15 ऑगस्टला ग्रामपंचायत जवळ ध्वजारोहण कार्यक्रम होणार असून त्यामध्ये सर्व शाळा अंगणवाडी सहभागी होऊन चित्ररथ सहभागी होणार आहेत. 16 ऑगस्टला कृषी आरोग्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असून दिनांक 17 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत मानवी साखळी द्वारे आडवली तीठा येथे करण्यात येणार आहे. यावेळी उपसरपंच,सर्व सदस्य ,गाव स्तरावरील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी वर्ग, गाव स्तरावरील सर्व आजी-माजी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक ,महिला बचत गट, महिला मंडळ ,भजन मंडळे युवक मंडळे, गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते,ग्रामपंचायत कर्मचारी, रिक्षा संघटना, व्यापारी वर्ग ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभत आहे.

error: Content is protected !!