पाककृती स्पर्धेत रुपाली वराडकर प्रथम..
मालवण | प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वराडकर हायस्कुलच्या सभागृहात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

महोत्सवाचे उद्घाटन खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. रानभाज्या निसर्गानेच निर्माण केल्या आहेत. रानभाज्यांचे कोकणाला वरदान लाभले असून देशस्तरावरच नाही तर जागतिक स्तरावर काही रानभाज्यांना मोठी मागणी वाढू लागली आहे. रानभाजी हे पूर्वी गरीबांचे खाणे होते आता ते श्रीमंताचे खाणे झाले आहे. पिढ्यान पिढ्या मार्गदर्शक ठरणारी ही तत्वे ख-या अर्थाने सुखी व निरोगी जीवनाचा मार्ग दाखवत आहे असे प्रतिपादन करुन खा. विनायक राऊत यांनी रानभाजी महोत्सवाचे कौतुक केले. तर आमदार वैभव नाईक म्हणाले, लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचे काम कृषि विभाग करत असुन त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची माहिती पोहोचून त्यांना लाभ घेता येतो.रानभाज्या व गावठी भाज्यांना इतर भाज्यांपेक्षा जास्त मागणी आहे. आपल्या निरोगी आरोग्यासाठी रानभाज्या आवश्यक असून रानभाज्यांचे संवर्धन करण्याचे काम आपण केले पाहिजे असे सांगितले. महोत्सवादरम्यान रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी 45 प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने प्रदर्शनात मांडण्यात आले होते तर पाककृती स्पर्धेत तालुक्यातील शेतकरी महिलांनी 56 प्रकारच्या रानभाज्यांच्या विविध पाककृतींचे सादरीकरण केले.
प्रथम क्र. रुपाली रमेश वराडकर (मोगरणे), द्वितीय क्र. गायत्री गणेश मुणगेकर (नांदोस), तृतीय क्र. विदुला विजय तामनकर (कट्टा), उत्तेजनार्थ म्हणून सुजाता एकनाथ राऊळ (बिबवणे), सुप्रिया संतोष गावडे (नांदोस), किशोरी नंदकिशोर मिटबावकर (वराड), प्रीतम महेंद्र कविटकर (कट्टा ), श्वेता गोपाळ सावंत (कट्टा) यांनी यश प्राप्त केले.
यावेळी समिक्षक म्हणून श्रीम. मेघा सावंत यांनी काम पाहिले. प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्यास अनुक्रमे डॉ चेतन म्हाडगूत, कट्टा, गणेश वाईरकर ग्रा.पं.सदस्य वरची गुरामवाडी व रामचंद्र गुराम, उद्योजक गुरामवडी यांचे मार्फत ट्रॉफी तसेच प्रथम तीन विजेत्यास काव्या कृषि सेवा केंद्र, कसाल यांचे मार्फत प्रत्येकी स्प्रेपंप व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ पाच विजेत्यांना ग्रा.पं. सरपंच वरची गुरामवाडी श्रीम. स्वाती वाईरकर यांचे मार्फत प्रत्येकी ट्रॉफी, काव्या कृषि सेवा केंद्र, कसाल यांचेकडून प्रत्येकी वैभव विळा आणि ललित मेडीकल, कट्टा यांचे कडून प्रत्येकी हँडवॉश व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. तसेच सर्व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
महोत्सवात कृषि विज्ञान केंद्र, किर्लोसचे विषय विशेषज्ञ विलास सावंत यांनी रानभाजीचे आहारातील महत्त्व, त्यांचे औषधी गुणधर्म व त्यापासून बनविण्यात येणारे विविध पदार्थ यावर सविस्तर उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी कणकवली प्रविण ओहोळ, तहसिलदार मालवण अजय पाटणे, गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी , मंडळ कृषि अधिकारी अतुल कांबळे, कृषि अधिकारी पंचायत समिती मालवण संजय गोसावी व शाळा संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर, हायस्कुल मुख्याध्यापक संजय नाईक आदी मान्यवर तसेच, कृषि विभाग मालवणचे कृषि पर्यवेक्षक धनंजय गावडे, सिताराम परब, दशरथ सावंत, मंदार सरमळकर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी, सर्व कृषि सहाय्यक , मालवण तालुक्यातील शेतकरी वर्ग व प्रशालेतील विद्यार्थी वर्ग आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि सहाय्यक, कट्टा पवनकुमार सौंगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषि पर्यवेक्षक मालवण धनंजय गावडे यांनी पार पाडले. प्रदर्शनस्थळी रामेश्वर ऍग्रो आचरा, सह्याद्री ऍग्रो कुंभारमाठ व काव्या कृषि सेवा केंद्र कसाल यांनी प्रदर्शनस्थळी शेती अवजारांचे प्रदर्शन मांडून शेतक-यांना माहिती दिली. यावेळी प्रदर्शनचा पाचशेहून अधिक जणांनी लाभ घेतला.