मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे संतांच्या दिव्य पादुका दर्शन सोहळा असंख्य स्वामी भक्तांच्या साक्षीने मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
श्री.स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक विश्वस्त अक्कलकोट भूषण श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांच्या संकल्पनेतून आणि संस्थापक अध्यक्ष श्री.प्रभाकर धाकू राणे यांच्या नियोजनात व त्यांच्या सहकारी यांच्या मेहनतीने संपन्न झाला.
संंत श्री साईनाथ महाराज, संत श्री गजानन महाराज, संत श्री रामदास महाराज,संत श्री गगनगीरी महाराज,संत श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांच्या दिव्य पादुका आणि श्री.स्वामी समर्थ महाराजांनी सेवीका सुंदराबाई काडगावकर पुणे यांना दिलेल्या पादुकांचे समस्त सिंधुदुर्ग वासीयांना एकाचवेळी दर्शन घेता आले.
सर्व संतांंच्या दिव्य पादुुका ऐकाच दिवशी एकत्र येणे फार मोठे दिव्याचे काम आहे. हे श्री.स्वामी कृपेने पार पडले किंबहुना महाराजांनी घडवून आणले असे यावेळी सचिव नंदकुमार पेडणेकर म्हणाले.
असा सोहळा आम्ही ह्या पूर्वी कधीच अनुभवला नाही.तो आज श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे महाराजांच्या मठात अनुभवला.आम्ही खुप ठीकाणी कार्यक्रमाला जातो. परंतु असा सोहळा कुठेच झाला नाही आणि होणार ही नाही असे पादुका सोबत आलेल्या मान्यवरानी सांगितले.
श्री.मोहन बुवा रामदासी म्हणाले, ही हडपीड भूमी संतांची भूमी झाली आहे.हा श्री.स्वामी समर्थ मठ आता संत पीठ झाले आहे.
कोकण कट्टाचे संस्थापक श्री.अजीत पितळे यांच्यासह त्यांच्या सहकारी मित्रानी सोहळ्यात मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रमास स्वामी भक्त श्री.प्रभाकर यशवंत राणे, श्री.नंदकुमार जंगम,श्री.सुजीत कदम, श्री.महेश घाडीगावकर, श्री.कमलेश रासम, श्री.स्वप्निल लोके, श्री.सत्यवान राऊत,श्री मधुकर भडसाळे, श्री.दादा गावडे, श्री.सुनिल वनकुंद्रे, श्री.बंडू डिके, श्री.चंद्रसेन पोवळे,श्री.संतोष गोरे,श्री.संदीप पोवळे,श्री.सुधीर तळेकर, श्री प्रवीण घुगे या सर्वांचे सहकार्य लाभले.