अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य..!!
सातशेहूनही अधिक मुलांना शिबिराचा लाभ..!!
वेंगुर्ला । देवेंद्र गावडे :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी आणि जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंब्रड, कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली, लक्ष्मीनारायण विद्यालय बिबवणे, तसेच डॉ रा.धों.खानोलकर हायस्कूल मठ वेंगुर्ला येथे शालेय मुलांची नेत्र तपासणी करण्यात आली.
सदर नेत्र तपासणी मध्ये 700च्यावर मुलांची नेत्र तपासणी करण्यात आली सदर नेत्र तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी नेत्रतज्ज्ञ संतोष सावंत,तेली, नाईक,मिर्नवास परब, उमेश गावडे , यांनी विशेष सहकार्य व मेहनत घेतली.
सदर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शालेय मुलांची नेत्र तपासणी कार्यक्रमांचे नियोजन ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी चे लक्ष्मण देसाई यांनी केले.