कांदळगाव सरपंच सौ .उमदी परब यांनी वेधले लक्ष..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
आचरा ते कांदळगाव मार्गे कुडाळ ही सकाळी ६.३० वाजता सुटणारी बसफेरी बंद असल्याने सदर बसफेरी पूर्ववत करावी अशी मागणी
कांदळगाव सरपंच सौ. उमदी उदय परब यांनी मालवण एस.टी आगार व कणकवली विभाग नियंत्रक यांच्या जवळ लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना कालावधीपूर्वी कुडाळ आचरा ही कुडाळ डेपोची सकाळी ६.३० वा. आचऱ्यावरुन सुटणारी एस. टी सकाळी ७ वाजता च्या दरम्याने कांदळगाव राणेवाडी, रतांबी स्टॉप मार्गे रामेश्वर मंदीर या ठिकाणाहून मालवण कुडाळला जात होती. सदर गाडी मध्ये कांदळगाव मधील बहुतांश शाळा, कॉलेजचे विद्यार्थी जात होते. परंतु कोरोना कालावधी नंतर सदरची गाडी बंद असल्यामुळे कांदळगावातील विद्यार्थ्यांना जाणे गैरसोयीचे होत आहे. परीणामी शालेय विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी आपणास विनंती आहे की, सदरची गाडी पूर्वी प्रमाणे नियमित सुरु केल्यास विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर होईल. तरी लवकरात लवकर सदरची गाडी सुरु करण्यात यावी अशी मागणी सरपंच सौ .उमदी परब यांनी केली आहे.