28.2 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

बांदा शहर ग्रामपंचायतीच्या १५ जागापैंकी आठ जागा महिलांसाठी राखीव…!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब :
बांदा शहर ग्रामपंचायतीच्या १५ जागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. ८ जागा महिलांसाठी राखीव झाल्याने ग्रामपंचायतीत महिला राज असणार आहे.
प्रभाग क्रमांक १ हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १ व सर्वसाधारण स्त्री साठी २ जागा राखीव झाल्या आहेत. या प्रभागात देऊळवाडी, मिठगुडीवाडी, लकरकोट, सटवाडी यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री १ जागा, सर्वसाधारण स्त्री १ जागा व सर्वसाधारण १ जागा असे आरक्षण आहे. या प्रभागात उभाबाजार, मोर्येवाडी, मुस्लिमवाडी यांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जाती १ जागा, सर्वसाधारण स्त्री १ जागा व सर्वसाधारण १ जागा असे आरक्षण आहे. या प्रभागात निमजगा, गवळीटेम्ब, गाडगेवाडी, शेटकरवाडी या वाड्यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १ जागा, सर्वसाधारण स्त्री १ जागा व सर्वसाधारण १ जागा असे आरक्षण आहे. या प्रभागात पानवळ, डोंगरवाडी यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री १ जागा, सर्वसाधारण स्त्री १ जागा व सर्वसाधारण १ जागा असे आरक्षण आहे. या प्रभागात हॉस्पिटल कट्टा, काळसेवाडी, सुतारवाडी, हरिजनवाडी या वाड्यांचा समावेश आहे. एकूण १५ पैकी ८ जागा या महिलांसाठी राखीव आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब :
बांदा शहर ग्रामपंचायतीच्या १५ जागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. ८ जागा महिलांसाठी राखीव झाल्याने ग्रामपंचायतीत महिला राज असणार आहे.
प्रभाग क्रमांक १ हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १ व सर्वसाधारण स्त्री साठी २ जागा राखीव झाल्या आहेत. या प्रभागात देऊळवाडी, मिठगुडीवाडी, लकरकोट, सटवाडी यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री १ जागा, सर्वसाधारण स्त्री १ जागा व सर्वसाधारण १ जागा असे आरक्षण आहे. या प्रभागात उभाबाजार, मोर्येवाडी, मुस्लिमवाडी यांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जाती १ जागा, सर्वसाधारण स्त्री १ जागा व सर्वसाधारण १ जागा असे आरक्षण आहे. या प्रभागात निमजगा, गवळीटेम्ब, गाडगेवाडी, शेटकरवाडी या वाड्यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १ जागा, सर्वसाधारण स्त्री १ जागा व सर्वसाधारण १ जागा असे आरक्षण आहे. या प्रभागात पानवळ, डोंगरवाडी यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्री १ जागा, सर्वसाधारण स्त्री १ जागा व सर्वसाधारण १ जागा असे आरक्षण आहे. या प्रभागात हॉस्पिटल कट्टा, काळसेवाडी, सुतारवाडी, हरिजनवाडी या वाड्यांचा समावेश आहे. एकूण १५ पैकी ८ जागा या महिलांसाठी राखीव आहेत.

error: Content is protected !!