शिरगांव | संतोष साळसकर :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या साळशी केंद्रस्तरीय विविध स्पर्धेत देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर साळशी हायस्कूल ने घवघवीत यश संपादन केले.
पहिली ते चौथीच्या गटामध्ये वकृत्व स्पर्धेत विराज कोदले प्रथम क्रमांक(साळशी न.१) श्रावणी वळंजू (रेंबवली शाळा)द्वितीय क्रमांक चंदना राणे तृतीय क्रमांक मिळाला (चाफेड शाळा) चित्रकला स्पर्धेत विराज कोदले प्रथम क्रमांक(साळशी नं१) भक्ती परब द्वितीय क्रमांक(चाफेड भोगलेवाडी शाळा) सोहम तर्फे तृतीय क्रमांक मिळाला(कुवळे तर्फेवाडी शाळा) निबंध स्पर्धेत विराज कोदले प्रथम क्रमांक व पारस वरेरकर द्वितीय क्रमांक( दोन्ही साळशी न १)श्रावणी वळंजु तृतीय क्रमांक मिळाला(रेंबवली शाळा )
पाचवी ते सातवीच्या गटात वकृत्व स्पर्धेत दर्शना लब्दे प्रथम क्रमांक आर्या गावकर द्वितीय क्रमांक श्वेता परब तृतीय क्रमांक (सर्व साळशी न.१) चित्रकला स्पर्धेत तनिषा गावकर प्रथम क्रमांक (साळशी न.१)नताशा मोडंकर द्वितीय क्रमांक (चाफेड शाळा) तनिषा कोकम तृतीय क्रमांक (रेंबवली शाळा) निबंध स्पर्धेत जानवी गावकर प्रथम क्रमांक आर्या गावकर द्वितीय क्रमांक हिमानी घाडी तृतीय क्रमांक (सर्व साळशी न.१) या दोन्ही गटात साळशी केंद्रबलातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या.
आठवी ते दहावीच्या गटात वकृत्व स्पर्धेत सुमन लब्दे प्रथम क्रमांक केतकी साळस्कर द्वितीय क्रमांक नम्रता पवार तृतीय क्रमांक (सर्व साळशी हायस्कूल) निबंध स्पर्धेत रिया भोगले प्रथम क्रमांक काजल घाडीगावकर द्वितीय क्रमांक सम्राट साळसकर तृतीय क्रमांक (सर्व साळशी हायस्कूल )चित्रकला स्पर्धेत दिव्या गावकर प्रथम क्रमांक मंदार साळस्कर( दोन्ही साळशी हायस्कूल)द्वितीय क्रमांक वेदांत कोरगावकर तृतीय क्रमांक(कुवळे हायस्कूल) या गटात साळशी हायस्कूल कुवळे हायस्कूल सांडवे हायस्कूल सहभागी झाले होते चित्रकला व निबंध स्पर्धेतील तीन विजेत्यांची निवड तालुका स्पर्धेसाठी झाली आहे तसेच वकृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची निवड तालुकास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.